उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते  : बेलफळाचे सरबत 

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते  : बेलफळाचे सरबत 
  • Positive News
  • एप्रिल 7 2025

Share on  

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते  : बेलफळाचे सरबत 
 भाग 4
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते, कारण बाटलीबंद सरबत पिल्याने फायदा होण्याऐवजी तोटे होण्याचे धोके जास्त असतात.

बेलफळाचे सरबत 

पिकलेली बेल फळे घेऊन स्वच्छ धुऊन फोडायची, आतमध्ये निघणारा गर चमच्याने काढून घ्यायचा. मोठ्या चाळणीवर टाकून त्यातील बिया बाजूला करायच्या. त्यामध्ये साखर, काळे मीठ, जिरे पावडर, चाट मसाला घालून ब्लेंडर मध्ये  फिरवायचे.
थंड पाण्यामध्ये मिक्स करून प्यावे .

फायदे: 
पचनसंस्था निरोगी ठेवते आणि उष्माघातापासून संरक्षण करते
प्रतिकारशक्ती वाढवते
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते( बिनसाखरेचे, काळेमीठ वापरून सरबत करावे)
श्वसनाच्या आजारांवर फायदेशीर
शरीर डिटॉक्स करते त्यामुळे 
त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर
जळजळ कमी करते
हृदय, यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त
रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते
केस गळणे आणि तुटणे देखील प्रतिबंधित करते.
विशेष सूचना:
बेलफळ अतिसारावर उपयुक्त असल्याने ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा लोकांनी किंवा गर्भवती महिलांनी जेवण करण्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ अंजली जाधव, ठाणे

संबंधित बातम्या