उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते
भाग 2
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते. कारण बाटलीबंद सरबत पिल्याने फायद्या ऐवजी तोटे होण्याचे जास्त धोके असतात.
शिकंजी:
उत्तर भारतात जास्त प्रचलित असलेला
लिंबू सरबताचा एक मसालेदार प्रकार.
कृती: एका भांड्यात माठामधले थंड पाणी, लिंबाचा रस, चवीप्रमाणे साखर, जिरे पावडर आणि काळे मीठ मिक्स करा. थोडी पुदिन्याचे पाने मिक्स करा आणि फ्रिजमध्ये ठेवून थोड थंड करा आणि काढून सर्व्ह करा.
फायदे :
विटामिन सी युक्त शिकंजी मुळे त्वरित ऊर्जा मिळते . उन्हाळ्यामुळे डीहायड्रेशन होऊन जो थकवा येतो तो दूर होतो. पचनशक्ती सुधारते. शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो.
डॉ. अंजली जाधव , ठाणे