आरोग्य विचार
उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते
भाग 1
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते कारण बाटलीबंद सरबत पिल्याने फायद्यापेक्षा तोटे होण्याचे जास्त धोके असतात.
आंब्याचे पन्हे
कच्च्या आंब्याची साल काढून त्याला कुकरमध्ये वाफवून घ्या नंतर वाटीने जेवढा गर निघेल त्याच्या दुप्पट गुळ किंवा साखर मिक्स करून, चवीपुरते मीठ घालून चाळणीवरून गाळून घ्या त्यात वेलदोडे केशर मिक्स करा आणि काचेच्या किंवा स्टीलच्या बाटलीमध्ये भरून हे सरबत फ्रिज मध्ये ठेवा. जेव्हा हवे असेल तेव्हा त्यातील थोडे सरबत घेऊन थोडे माठातले थंड पाणी मिक्स करून प्यायला द्या.
फायदे
आंब्याच्या पन्ह्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी6 आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि कर्करोगापासून संरक्षण करतात. हे पेय उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यास मदत करते आणि ताजेतवाने वाटते.
डॉ. अंजली जाधव ठाणे