उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : जिंजर मिंट लेमोनेड

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : जिंजर मिंट लेमोनेड
  • Positive News
  • एप्रिल 13 2025

Share on  

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते
भाग 10
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते कारण बाटलीबंद सरबत पिल्याने फायद्यापेक्षा तोटे होण्याचे जास्त धोके असतात.

जिंजर मिंट लेमोनेड

उन्हाळ्यात खूप घाम येतो त्यामुळे डीहायड्रेशन होते अशावेळी थंडगार लिंबू सरबत आपल्याला त्वरित ऊर्जा देते. अशा ह्या लिंबू सरबताला वेगळा फ्लेवर दिला की तेवढीच वेगळी चव आणि आरोग्याचे विविध फायदे पण भेटतात.

कृती:
1 चमचा सब्जा पाण्यात घालून भिजवून घ्या.
अर्धी वाटी पुदिन्याची  पाने घेऊन स्वच्छ धुऊन घ्या.
2 चमचे लिंबू रस , अर्धा इंच आले , चवीपुरती खडीसाखर, काळ मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्या.
हे मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यात दोन ग्लास पाणी घाला आणि हे मिश्रण गाळणीने गाळून घ्या. त्यामध्ये भिजवलेला सब्जा मिक्स करा, बर्फ घालून पुदिन्याच्या पानांनी सजवून प्यायला द्या. (हवे असल्यास पाण्याऐवजी सोडा वापरू शकता)

फायदे:

पुदिना पाचक असतो त्यामुळे अपचन मळमळ त्यापासून आपला बचाव होतो. 

लिंबू मध्ये भरपूर विटामिन सी असते त्यामुळे आपली त्वचा टवटवीत राहते तसेच पचनासाठी लिंबू उपयुक्त ठरते. 

आले पण पाचक असल्यामुळे चांगली भूक लागते. 

सब्जा प्रकृतीने थंड असतो आणि त्यात फायबर जास्त प्रमाणात असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि शरीरातील उष्णता कमी होते. 

डॉ अंजली जाधव,
 ठाणे

संबंधित बातम्या