उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : पुदिना सरबत

 उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : पुदिना सरबत
  • Positive News
  • एप्रिल 17 2025

Share on  

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते

भाग 14
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते  घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते कारण बाटलीबंद सरबत पिल्याने फायद्यापेक्षा तोटे होण्याचे जास्त धोके असतात.

पुदिना सरबत

बाराही महिने मार्केटमध्ये मिळणारा , किंवा आणलेल्या पुदिन्याच्या काड्या जर कुंडीत लावल्या तर लगेच उगवून येणारा असा सहज उपलब्ध असणारा पुदिना आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. तो पाचक असल्यामुळे अपचनाच्या तक्रारी दूर करतो.

कृती:
दोन वाट्या स्वच्छ धुऊन घेतलेली पुदिन्याची पाने.
 दोन चमचे लिंबूचा रस.
 एक चमचा बडीशेप पावडर.
 चवीप्रमाणे काळे मीठ. आणि चवीप्रमाणे साखर हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे,  त्यानंतर त्यात दोन ग्लास थंड पाणी टाकून गाळणी वरून हे मिश्रण गाळून घ्यायचे.  थंडगार आणि चविष्ट असे हे सरबत सगळ्यांनी जरूर बनवा. आपल्या घरी कोणी पाहुणे जेवायला  येणार असतील तर हे पाचक वेलकम ड्रिंक म्हणून पण आपण जरूर देऊ शकतो.

फायदे:

पुदिना पचनक्रियेला मदत करतो. 

 नैसर्गिकरित्या ताजेतवाने असतो आणि शरीराला ऊर्जा देतो.

 त्वचेला ताजेतवाने आणि चमकदार बनवतो.

 दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यास मदत करतो.

सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी मदत करतो.

मेंदूला शांत करतो आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करतो.

चयापचय वाढवतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
 
बडीशेपमध्ये फायबर असते, जे पचनास मदत करते आणि अपचन, पोटदुखी यांसारख्या समस्या कमी करते. 

थंड असल्याने  शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णता कमी होते. 

व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

बडीशेपमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. 

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी,  अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, आणि बीटा-कॅरोटीन असते. लिंबूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. 

डॉ अंजली जाधव,
 ठाणे
????

संबंधित बातम्या