उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : आंबा पुदिना सरबत

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते : आंबा पुदिना सरबत
  • Positive News
  • एप्रिल 19 2025

Share on  

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते

भाग 15
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते कारण बाटलीबंद सरबत पिल्याने फायद्यापेक्षा तोटे होण्याचे जास्त धोके असतात.

आंबा पुदिना सरबत

आंब्याचे पन्हे जे आंबा शिजवून केले जाते ते सर्वांना माहीत आहे परंतु कच्च्या आंब्याचे सरबत सुद्धा तितकेच रुचकर लागते. आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्याचे काम पण करते. 

कृती:

मध्यम आकाराचे दोन आंबे स्वच्छ धुऊन, साल काढून किसणीवर किसून घ्या. 
एका स्टीलच्या पातेल्यात एक लिटर पाणी घ्या आणि त्यामध्ये हा आंब्याचा खिस  घालून एक तास ठेवा. नंतर गाळणीवर टाकून गाळून घ्या . त्या पाण्यात काळे मीठ जाडसर वाटलेला पुदिना, चवीप्रमाणे साखर, आणि आवडत असल्यास जिरेपूड,  मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून हे सर्व थंड करा आणि थंडगार सरबत प्यायला द्या. 
 
टीप: :वरती जो गाळणी वरचा खिस आहे तो टाकून द्यायचा नाही त्यामध्ये गूळ वेलदोडे दालचिनी पावडर जिरे पावडर घालून मिश्रण शिजवून घ्या, याचा छान मुरांबा बनतो. 

आंबा सरबत चे फायदे:

पुदिन्यात वात कमी करण्याची आणि पचन सुधारण्याची क्षमता असते, ज्यामुळे गॅस आणि अपचनासारख्या समस्या कमी होतात. तसेच त्यात अँटिऑक्सिडंट असतात जे शरीराला फायदेशीर ठरतात.

आंब्याचे सरबत शरीराला थंड ठेवते, ज्यामुळे उन्हाळ्यात आराम मिळतो. 
 
कच्च्या आंब्यामध्ये विटामिन सी असते,जे शरीराला ऊर्जा पुरवते, शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते.
पुदिन्यात व्हिटॅमिन ए आणि सी असते, जे त्वचेसाठी चांगले असतात. 
पुदिना केस मजबूत आणि चमकदार बनण्यास मदत करतो. 

डॉ अंजली जाधव,
 ठाणे

संबंधित बातम्या