उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते :  सब्जामृत

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते :  सब्जामृत
  • Positive News
  • एप्रिल 6 2025

Share on  

उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते :  सब्जामृत
भाग 3
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते, कारण बाटलीबंद सरबत पिल्याने फायदा होण्याऐवजी तोटे होण्याचे धोके जास्त असतात.
सब्जामृत
गुळ आणि सब्जा उन्हाळ्यात हे सरबत खूप उपयोगी आहे कारण दोन्हीही प्रकृतीने थंड असतात. गुळामध्ये क्षार असतात , उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील क्षार बाहेर पडून शरीरात जी कमतरता निर्माण होते, ती यामुळे भरून निघते.

साहित्य:
पाणी - 2 ग्लास
गूळ -चवीनुसार
सब्जा बिया - 1 चमचा भिजलेल्या सब्जा बिया,
लिंबाचा रस चवीनुसार
आवडत असल्यास
पुदिन्याची पाने - थोडीशी 
कृती:
एका भांड्यात पाणी आणि गूळ मिसळून 
गूळ विरघळल्यावर गाळणीतून गाळून घ्या कारण कधी कधी गुळामध्ये खडे असतात
गाळलेल्या पाण्यात भिजवलेला सब्जा टाका.
लिंबाचा रस आणि आवडीनुसार पुदिन्याची पाने मिसळा.
ठंड झाल्यावर  प्या.
सब्जामृत चे फायदे:
???? लिंबातील विटामिन सी आणि गुळातील आयर्न यामुळे त्वरित ऊर्जा मिळते.
????उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो.
????पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
????शरीरात पाण्याची कमतरता भरून काढते.

संबंधित बातम्या