उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते
भाग 13
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते कारण बाटलीबंद सरबत पिल्याने फायद्यापेक्षा तोटे होण्याचे जास्त धोके असतात.
पिना कोलाडा
(अल्कोहोल विरहित)
पिना कोलाडा हे एक उष्णकटिबंधीय मॉकटेल आहे. यामध्ये अननस नारळाचे पाणी आणि नारळाचे दूध आणि हलकेसे अल्कोहोल वापरून एक उत्तम सरबत बनवले जाते.
पण आपण इथे बिना अल्कोहोलचे पेय बनवणार आहोत त्यामुळे ते आरोग्यासाठी उत्तम आहे.
कृती:
दोन कप अननसाचे तुकडे
दोन चमचे साखर
दोन कप शहाळ्याचे पाणी
हे सर्व एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर चाळणीवर टाकून गाळून घ्यावे. परत मिक्सरमध्ये घेऊन त्यामध्ये
एक कप नारळाचे दूध आणि थोडा बर्फ टाकून मिक्सर मधून हलकेसे फिरवावे.
ग्लासमध्ये घेऊन , सजावट करून प्यायला द्यावे.
फायदे:
अननसात असलेले ब्रोमेलेन हे एन्झाइम प्रथिने पचवण्यास मदत करते.
अननसात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि एन्झाइम्स जळजळ आणि अनेक आजारांपासून संरक्षण करतात.
रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
पचनक्रिया सुधारते.
स्नायूंना आराम मिळतो.
झोपेची गुणवत्ता सुधारते.
रक्तदाब संतुलित राखण्यास मदत होते.
केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगले असते.
यातील शहाळे आपल्या एकंदरीत आरोग्यासाठी चांगले असते
त्वचा निरोगी होते, शरीर हायड्रेटेड राहते, किडनीच्या आरोग्यासाठी शहाळे चांगले असते . अशक्तपणा दूर होऊन प्रतिकारक शक्ती वाढते.
नारळाचे दूध त्यातील भरपूर अँटिऑक्सिडंट मुळे त्वचेसाठी चांगले असते.
डॉ अंजली जाधव,
ठाणे