नाशिकचे जिल्हाधिकारी चक्क रिक्षाने कार्यालयात ....

नाशिकचे जिल्हाधिकारी चक्क रिक्षाने कार्यालयात ....
  • Positive News
  • एप्रिल 9 2025

Share on  

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रत्येक महिन्यातील पहिला सोमवार नो व्हेइकल डे आणि युनिफॉर्म डे हा उपक्रम जाहीर केला होता. त्यानुसार जानेवारी महिन्यापासून महिन्याच्या प्रत्येक सोमवारी नो व्हेईकल डे आणि युनिफॉर्म डे ची अंमलबजावणी करण्यात येते.काल एप्रिल महिन्यातील पहिल्या सोमवारी दि.७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह कार्यालयातील पुरूष व महिला कर्मचाऱ्यांनी नो व्हेइकल आणि युनिफॉर्म डे ची अमंलबजावणी केली.

जिल्हाधिकारी जलज शर्मा हे त्यांच्या शासकीय निवास्थापासून रिक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. तर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी देखील वाहनांचा वापार न करता पायी कार्यालयात पोहोचले. ज्या कर्मचाऱ्यांचे निवासस्थान दूर आहे अशा कर्मचाऱ्यांनी सायकलने जिल्हाधिकारी कार्यालय गाठणे पसंत केले. कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहनसेवेचा उपयोग केला.

संबंधित बातम्या