Good News ; किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर,  उद्यापासून  नियम लागू ...शेतकऱ्यांना फायदा

Good News ; किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर,  उद्यापासून  नियम लागू ...शेतकऱ्यांना फायदा
  • Positive News
  • मार्च 31 2025

Share on  

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर,  उद्यापासून  नियम लागू ...शेतकऱ्यांना फायदा

देशात 31 डिसेंबर 2024 पर्यंत किसान क्रेडिट कार्डवर 10 लाख कोटींचं वितरण करण्यात आलं आहे. याचा फायदा 7.72 कोटी शेतकऱ्यांना झाला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा यापूर्वी 3 लाख रुपये होती.किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी बियाणं, रासायनिक खते, कीटकनाशे, कृषी वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज घेता येईल. पीक काढणीच्या वेळी देखील त्याचा वापर करता येतो.2019 पासून किसान क्रेडिट कार्डमध्ये पशूपालन, डेअरी आणि मत्स्यपालन यासारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

३1 डिसेंबर 2024 पर्यंत किसान क्रेडिट कार्डवरुन शेतकऱ्यांना 10 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचं वितरण कऱण्यात आलं आहे. याचा फायदा 7.72 कोटी शेतकऱ्यांना झाला आहे. 2014 मध्ये कर्जाची रक्कम 4.26 लाख कोटी होती.केंद्र सरकारनं कृषी मंत्रालयाचं बजेट 275 टक्क्यांनी कमी करुन 1.37 लाख कोटी केलं आहे. त्याचवेळी मत्स्यपालन, पशूपालन आणि डेअरीच्या निधीत 37 टक्क्यांची वाढून ते 7544 कोटी करण्यात आलं आहे.खाद्य प्रक्रियेसाठी 4364 कोटी करण्यात आलं.

संबंधित बातम्या