कर्मयोगी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नाशिक यांचे वतीने त्र्यंबक तालुक्यातील अती दुर्गम अशा हेदुली पाडा, हेद पाडा, येथील आदिवासी बांधवांना दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून दिवाळीचे फराळ ,मिठाई, आणि कपडे, वाटप करण्यात आले तसेच दिवाळी सणाचे महत्त्व सांगण्यात आले.या कार्यक्रमाने तेथील आदिवासी बांधव भारावून गेले होते. दरवर्षी मोठ्या उत्साहात हा उपक्रम पाड्यांवर आयोजित केला जातो .या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने दिवाळी सण साजरा केल्याचे संस्थेच्या प्रत्येक सदस्याला जाणवत होते. तसेच लहान मुले तसेच आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता . पुढच्या वर्षी पुन्हा या असे सर्वजण सांगत होते.या कार्यक्रम यशस्विते साठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज पळसकर, सदस्य अँड उमेश पटेल, केशव तांबे, सूरज गलांडे, ,रामदास शीद आदींनी परिश्रम घेतले. सर्व बांधव आणि महिला, लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.