मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमांतर्गत ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) मतदारांच्या घरी भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक अर्ज (फॉर्म) वाटप करण्यात येणार असून, पात्र मतदारांची माहिती पडताळून घेण्यात येईल.
नागरिकांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र (EPIC)
सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक
२ नवीन रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो
फॉर्मवर लावण्यासाठी २ नवीन रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहेत. फोटो उपलब्ध नसल्यास ते आधीच काढून तयार ठेवल्यास अर्ज भरण्याची प्रक्रिया जलद व सुलभ होईल.
BLO अधिकारी घरभेटीदरम्यान आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे. तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि परिसरातील इतर मतदारांपर्यंतही ही माहिती पोहोचवावी, जेणेकरून प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अद्ययावत राहील.
अस्वीकरण : ही माहिती जनजागृतीच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. स्थानिक निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा भारत निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत सूचनांनाच अंतिम मान्यता असेल.
"सजग मतदार – सक्षम लोकशाही!"