मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विलेपार्ले, मुंबई येथे 'मुंबई मेट्रो मार्ग 7अ' वरील डाऊनलाईन टनल ब्रेकथ्रू कार्यक्रमादरम्यान पाहणी केली आणि संबंधित अधिकार्यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
1 सप्टेंबर 2023 रोजी पहिले TBM मशिन जमिनीपासून 30 मीटर खाली भूगर्भात उतरवण्यात आली. मेट्रो मार्ग 3 च्या वरुन सहार उन्नत रस्त्यांखालून, मोठ्या सांडपाणी वाहिन्या व जलवाहिन्यांना क्रॉस करुन TBM ने बोगद्याचा ब्रेकथ्रू आज यशस्वीरित्या पूर्ण केला. मेट्रो मार्ग 7अ मुळे मुंबई महानगर प्रदेशातील विविध मेट्रो मार्ग थेट विमानतळापर्यंत मेट्रोने जोडले जातील.
याप्रसंगी मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार पराग आळवणी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.