*--II ● विवेक विचार ● II--*

     *--II ● विवेक विचार ● II--*
  • Positive News
  • मार्च 15 2026

Share on  

.               *--II ● विवेक विचार ● II--*


*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२०९ वा दिवस*

            मानवी हृदयातील सर्व भावनांची तीव्र गती हाच मुक्ती मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे. या शूद्र जगाचा त्याग, या पृथ्वीचा त्याग ,सोन्याचा त्याग, शरीराचा त्याग आणि सीमा असलेल्या सर्व वस्तूंचा त्याग. आपण जर मन आणि इंद्रियांना जाणणाऱ्या या लहानशा जगाची आपल्याला असलेली आसक्ती दूर केली तर आपण त्याक्षणी मुक्त होऊ शकतो. बंधनातून मुक्त होण्याचा एकमेव उपाय आहे सर्व नियमांच्या बाहेर जाणे कार्यकारण साखळीच्या बाहेर पडणे. मुक्तीचा अर्थ आहे पूर्ण स्वातंत्र्य. शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारच्या बंधनातून मुक्त होणे. साखळी ही लोखंडाची असो की सोन्याची ती साखळीच असते. ती बंधनात अडकवते.
                                 *स्वामी विवेकानंद...*                        
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर फाल्गुन २३ शके १९४७*
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १४ मार्च २०२६                                                                                                                                                     
★१८७९ जर्मन भौतिक शास्त्रज्ञ, नोबल पारितोषिक विजेते अ‍ल्बर्ट आईनस्टाइनचा जन्मदिन
★ १८८३ समाजवादी विचारवंत, लेखक कार्ल मार्क्स यांचा स्मृतिदिन
★ २००३ कविवर्य सुरेश भट यांचा स्मृतीदिन. 
★ २०१८ पृथ्वीच्या उत्पत्तीचा सिध्दांत मांडणारे फिजिसिस्ट प्राध्यापक स्टीफन हाॅकिंग यांचा स्मृतिदिन
★ राष्ट्रकुल दिन.
*संकलन - प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*

संबंधित बातम्या