वाकून नमस्कार करणे ही केवळ परंपराच नाही तर त्यापाठीमागे एक शास्त्र आहे जे आपल्या प्रत्येक भारतीय परंपरेमागे असतेच
आपण आपल्या ज्येष्ठांच्या पाया पडून नमस्कार करतो. ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श केल्याने केवळ आशीर्वादच मिळतात असे नाही, तर आरोग्यदायी फायदेही मिळता.ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. सुसंस्कृत घरांमध्ये लहानपणापासूनच ज्येष्ठांना नमस्कार करावा असे मुलांना शिकवले जाते. चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतल्याने शक्ती, बुद्धी, ज्ञान, सुख आणि समृद्धी मिळते, असे ऋषी सांगतात. पाया पडणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवून जेव्हा आशीर्वाद दिले जातात तेव्हा सकारात्मक ऊर्जा पाया पडणाऱ्या व्यक्तीच्या माथ्या मधून शरीरात प्रवेश करते.
नमस्कार करण्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे ते जाणून घेऊयात...
????जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास होत असेल तर दररोज सकाळ-संध्याकाळ घरातील ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या. असे म्हणतात की वाकून नमस्कार केल्याने कंबर आणि पाठदुखीच्या समस्येपासून लवकर आराम मिळतो. चरणस्पर्श दरम्यान, शरीर वाकते , त्याचा टाचे पासून माने पर्यंत सर्व स्नायूंवर ताण येतो आणि स्नायूंची लवचिकता वाढते, रक्ताभिसरण चांगले होऊ लागते.
???? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज आई-वडिलांच्या किंवा घरातील वडीलधाऱ्यांच्या पायाला स्पर्श केल्यास त्वचेच्या आणि केसांच्या समस्या कमी होतात. कारण
जेव्हा आपण एखाद्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकतो तेव्हा रक्ताभिसरण खूप चांगले होते. हृदयाचे आरोग्य सुधारते.
????पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याने मज्जासंस्था सुधारते. पायांना स्पर्श केल्याने शरीरातील काही बिंदू दाबले जातात, ज्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
समजा घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती नसेल किंवा काही जणांना कोणाच्या पाया पडणे कमीपणाचे वाटत असेल तर दररोज कमीत कमी स्वतःच्या तरी वाकून पाया पडाव्यात.
डॉ अंजली जाधव,
ठाणे ( निसर्गोपचार तज्ञ आणि अल्टरनेटिव्ह थेरपी हीलर )