आई.ए.पी.इ.एन. इंडिया नाशिक शाखेचा  8 नोव्हेंबरला पदग्रहण सोहळा

आई.ए.पी.इ.एन. इंडिया नाशिक शाखेचा  8 नोव्हेंबरला पदग्रहण सोहळा
  • Positive News
  • नोव्हेंबर 8 2025

Share on  

आई.ए.पी.इ.एन. इंडिया नाशिक शाखेचा  8 नोव्हेंबरला पदग्रहण सोहळा


नाशिक :   आई.ए.पी.इ.एन इंडिया असोसिएशनच्या नाशिक शाखेचा पदग्रहण सोहळा 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ट्रीट हॉटेल गोविंद नगर येथे होणार आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे चीफ क्लीनिकल नुट्रीशिनिस्ट डॉ.शिवशंकर तिमानपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. सुजित चंद्रात्रेय, सचिव क्षितिजा गायकवाड, उपाध्यक्ष पिया हळदणकर, खजिनदार एकता किंगर यांनी दिली.
IAPEN India ही एक व्यावसायिक आणि सामाजिक संस्था आहे, जी 2019 साली स्थापन झाली.
या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे.
हॉस्पिटलमध्ये असलेल्या किंवा घरी उपचार घेत असलेल्या अशा रुग्णांना योग्य पोषण मिळावं जे ‘माल्न्यूट्रिशन’च्या जोखमीमध्ये आह.  IAPEN India चं काम फक्त हॉस्पिटलपुरतं मर्यादित नाही.
ही संस्था डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट, डॉक्टर आणि हॉस्पिटल व्यवस्थापक यांना एकत्र आणते,जेणेकरून रुग्णांना योग्य पोषण देखभाल मिळेल.संस्था सेमिनार, कॉन्फरन्स, आणि ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित करते,
ज्यातून पोषणविषयक जागरूकता आणि संशोधनाला चालना दिली जाते.
आपल्या देशात अजूनही अनेक रुग्णांना योग्य आहार न मिळाल्यामुळे बरे होण्यास वेळ लागतो.
याच पार्श्वभूमीवर IAPEN India सारख्या संस्था आरोग्य व्यवस्थेचं एक महत्त्वाचं अंग बनल्या आहेत.
त्या केवळ पोषण सुधारत नाहीत,
तर हॉस्पिटल आणि कम्युनिटी दोन्हीकडे ‘वैज्ञानिक पद्धतीने आहार कसा द्यावा’ यावर प्रशिक्षण देतात . आरोग्य सुधारण्यासाठी योग्य आहार हेच खरं औषध आहे.
आणि IAPEN India सारख्या संस्था हाच संदेश समाजापर्यंत पोहोचवतात.
 या कार्यक्रमात... डॉ.सुजित चंद्रात्रे,क्षितीजा गायकवाड,पिया हळदणकर, एकता किंगर , रिश्ती मेहता, हर्षदा काकडे, विशाखा गोरे, सियाम शेख, पूजा देवरे , अनुजा जोशी, प्रियांका कोरी, या  पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण होईल. तसेच हाऊ टू कंडक्ट रिसर्च इन न्यूट्रिशन या विषयावर डॉ. शिवशंकर मार्गदर्शन करतील. ह्या सेशन चे अध्यक्ष पद डॉ. देवदत्त चाफेकर हे भूषवातील. ह्या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन ज्येष्ठ आहार तज्ञ पूजा शिरभाते व  केतकी पुजारे या करणार आहेत.

संबंधित बातम्या