निवृत्त वीज कर्मचारी यांच्या याचिकेवर आता 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी

निवृत्त वीज कर्मचारी यांच्या याचिकेवर आता 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी
  • Positive News
  • ऑक्टोबर 16 2026

Share on  

निवृत्त वीज कर्मचारी यांच्या याचिकेवर आता 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी


नागपूर : विद्युत मंडळ निवृत्त कर्मचारी संघ केंद्र नागपूर ( याचिका करते )            याचिका क्रमांक 5745/2018                खंडपीठ न्यायमूर्ती माननीय उर्मिला जोशी/ फाळके व न्यायमूर्ती माननीय राज वाकोडे    सुनावणी तारीख  व क्रमांक   14/10/2026 याचिका यादी क्रमांक  69              . 
 सर्व सन्माननीय संघटनेचे सदस्य व निवृत्त कर्मचारी, अधिकारी, अभियंते    ........  ... यापूर्वीच्या सुनावणी आदेशाप्रमाणे आपली पेन्शन याचिका ही दिनांक 1 ऑक्टोबर 2026 सुनावणीसाठी   निश्चित केली होती. परंतु या तारखेला एकलखंड पीठ असल्यामुळे आपली पेन्शन याचिका  या खंडपीठांसमोर सुनावणीसाठी लागली नव्हती. परिणामी सर्कुलेशन अर्जाप्रमाणे आज आपली याचिक दिनांक14 ऑक्टोबर 2026 रोजी अग्रक्र क्रमांक 69 अंतिम सुनावणीसाठी याचिका यादीमध्ये नमूद करण्यात आली होती. या अग्रक्रमाप्रमाणे  याचिकेवरील सुनावणी चार वाजता नंतर लागली असती. परंतु माननीय खंडपीठाने ज्येष्ठ नागरिक अग्रक्रम,फार जुने मॅटर लक्षात घेऊन दुपारी 2.30 वाजता याचिकेवर सुनावणी घेतली अति महत्त्वाची जुनी केस लक्षात घेऊन दिनांक 30 नोव्हेंबर 2026 रोजीचे यादीमध्ये सर्वात  प्रथम अग्रक्रमित सुनावणी घेण्याचे निश्चित आदेश दिले. आपली याचिका इतर ओ पी एस या याचिकेसोबत टॅग केली नाही त्याऐवजी आपल्या याचिकेला विशेष प्राधान्य दिले व स्वतंत्ररीत्या सुनावणी घेण्याचे निश्चित केले                         तेव्हा वरील विवेचनावरून व सुनावणी आदेशावरून आपले निदर्शनास आणू इच्छितो की आपली याचिका विशेष प्राधान्य व ज्येष्ठ नागरिक प्रायोरिटी तसेच जुने मॅटर या बाबी  माननीय खंडपीठाने लक्षात घेतल्या असे स्पष्ट करतो़. तेव्हा पुढील सुनावणी 30 नोव्हेंबर  2026 रोजी सकाळीच साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे यावर मी आपले लक्ष वेधू इच्छितो व आणखी संयम ठेवावा अशी या  संदेशाद्वारे विनंती करतो .
    .....                                 साहेबराव चरडे अध्यक्ष विद्युत विद्युत मंडळ केंद्र नागपूर

संबंधित बातम्या