Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार आज फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे देणार आहे. महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माहिती दिली की, आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांसाठी संपूर्ण रक्कम मिळेल. राज्यातील महिलावर्ग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. २०२५ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे की थकबाकीचे हप्ते २.५२ कोटी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील.
माहिती देताना महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यासाठी आठव्या आणि नवव्या हप्त्या म्हणून ३,००० रुपये ( १,५०० + १,५००) ची रक्कम दिली जाईल. सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार, ही रक्कम ८ मार्च २०२५ पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक उपक्रम असून ज्याचा उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आहे. या योजनेअंतर्गत, २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.