टेलरिंग व असिस्टंट ड्रेस मेकर प्रशिक्षणार्थींसाठी रोजगार संधी — “WEMPIRE THE WAY YOU DREAM” कंपनीत मुलाखती

टेलरिंग व असिस्टंट ड्रेस मेकर प्रशिक्षणार्थींसाठी रोजगार संधी — “WEMPIRE THE WAY YOU DREAM” कंपनीत मुलाखती
  • Positive News
  • नोव्हेंबर 12 2025

Share on  

टेलरिंग व असिस्टंट ड्रेस मेकर प्रशिक्षणार्थींसाठी रोजगार संधी — “WEMPIRE THE WAY YOU DREAM” कंपनीत मुलाखती

नाशिक (प्रतिनिधी) — मराठा विद्या प्रसारक समाज संचालित जन शिक्षण संस्थान, नाशिक येथील उत्तमनगर सिडको केंद्रातील टेलरिंग व असिस्टंट ड्रेस मेकर कोर्सच्या प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या वतीने “WEMPIRE THE WAY YOU DREAM” या कंपनीला भेट देण्यात आली.

या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे आदरणीय चेअरमन मा. बाळासाहेब शिरसागर साहेब आणि संचालक राहुल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थी महिलांना कंपनीची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच त्यांच्या मुलाखती कंपनीचे संचालक श्री. निखिल पाटील यांनी घेतल्या.

या वेळी जन शिक्षण संस्थानचे कार्यक्रम सहाय्यक प्रताप देशमुख, प्रतीक ठाकरे, शिक्षिका सौ. सविता पवार तसेच सुमारे ४० प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

संबंधित बातम्या