मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही. आर सुब्रमण्यम यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नियोजन विभागाच्यावतीने आयोजित 'विकसित महाराष्ट्र 2047 - बिग आयडियाज ब्रेनस्टॉर्मिंग वर्कशॉप' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
या वर्कशॉपमध्ये मांडलेल्या संकल्पना राज्याच्या दीर्घकालीन विकास आराखड्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील 20-25 वर्षांसाठी प्रभावी दस्तावेज तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, विकसित भारत घडवण्यासाठी महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी करणे आवश्यक आहे आणि यासाठी नीती आयोगाचे विशेष लक्ष आपल्या राज्याकडे आहे. या संवाद प्रक्रियेतून राज्याच्या विकासाला गती देणाऱ्या 'मोठ्या कल्पना' पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वर्कशॉपमध्ये रोजगार संधी, पायाभूत सुविधा, सक्षमीकरण व जीवनमानाची गुणवत्ता, तसेच संस्थात्मक क्षमता आणि सुशासन या चार प्रमुख मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.