जापानच्या आयची नागोया येथे सुरु असलेल्या एशियन्स गेम्स स्पर्धेच्या 13 व्या दिवशी भारतीय अॅथलीटसकडून पदकांची लयलुट सुरु आहे. आजसकापासून भारतीय अँथलीट गोल्ड मेडलची रांग लावतायत. त्यात आता भारताच्या महिला संघाने हॉकीमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. फायनलमध्ये चार वेळा विजेत्या असलेल्या चीनचा 1-0ने पराभव करून भारतीय महिला संघाने हे गोल्ड मेडल जिंकलं आहे.त्यामुळे आता भारताच्या खात्यात आणखी एका गोल्ड मेडलची भर पडली आहे. विशेष भारताने आज जिंकलेल हे सहावे गोल्ड आहे.
खरं भारत आणि चीन यांच्यात फायनल सामना एक तास आधीच नियोजित होता. पण वाहतुक कोंडीमुळे भारतीय टीमला मैदानात पोहोचायला उशीर झाला.त्यामुळे उशिराने सामन्याला सुरुवात झाली होती.गोल्ड मेडलसाठी पार पडलेल्या या सामन्यात पहिल्या 10 व्या मिनिटालाच लालरेम्सियामी ह्मार्झोटेने पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. ही आघाडी भारताने पुढे सामना संपेपर्यंत कायम ठेवत गोल्ड मेडल जिंकलं आहे.
पहिल्या 10 व्या मिनिटालाच लालरेम्सियामी ह्मार्झोटेने पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर 22 व्या मिनिटाला पॅनेल्टी स्ट्रोकवर सविताने शानदार सेव करत भारताला वाचवले.अशाप्रकारे दुसऱ्या क्वार्टरपर्यंत भारताने 1-0 ही आघाडी कायम ठेवली.
भारताने आघाडी घेतल्याने चीन आणखी आक्रामकपणे मैदानात खेळत होती. 33 व्या मिनिटाला पुन्हा चीनने गोल करण्याचा प्रयत्न केला.चीनने पॅनेल्टी कॉर्नवर गोल करण्याचा प्रयत्न केला पण नवीन कौरने गोललाईनवर शानदार सेव केलं. त्यानंतर अंपायरने चीनला पेनेल्टी स्ट्रोक दिला. परंतु भारताच्या रेफरलने हा निर्णय फिरवला आणि पेनल्टी स्ट्रोकच्या जागी दुसरा पेनल्टी कॉर्नर देण्यात आला.
तरीही, भारतीय खेळाडूंनी चीनचे ड्रॅग फ्लिक्स रोखण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. सर्वात आधी पुढे सरसावलेल्या सलीमा टेटेच्या हाताला जोरदार फटका बसला आणि तिला काही काळासाठी मैदान सोडावे लागले. तिच्या जागी बलजीत कौर आली होती.