छ. संभाजीनगर : दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या दिपालीने मिळवले 100 पैकी 100 गुण

छ. संभाजीनगर : दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या दिपालीने मिळवले 100 पैकी 100 गुण
  • Positive News
  • मे 15 2025

Share on  

छ. संभाजीनगर : दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या दिपालीने मिळवले 100 पैकी 100 गुण 

                  दहावीचा अर्थात एसएससी चा निकाल जाहीर झालेला आहे. आणि या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींनी बाजी मारली मात्र छत्रपती संभाजी नगर शहरातील रामनगर असलेल्या सामान्य कुटुंबातील दिपाली प्रमोद शिंदे या मुलीने अवघा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. तिने 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत. आणि 100% यश जे आहे ते दिपालीने मिळवलेला आहे. अगदी छोट्याशा कुटुंबात सर्वसाधारण कुटुंबामध्ये दिपालीचा जन्म झालेला आहे. आणि तिचे वडील मजुरीचे काम करतात, तर आई कंपनीमध्ये काम करते. अशाही परिस्थितीमध्ये स्वतःच्या शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष देत दिपालीने हे घवघवीत यश मिळवलं आहे.

संबंधित बातम्या