बुलढाणा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निलेश महाराज झरेकर यांना राष्ट्रीय स्वामी विवेकानंद पुरस्काराचे वितरण
बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी सोहळा 10 मे ते 18 मे पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. संत चोखोबाच्या जन्मभुमी अयोध्या येथील श्रीराम जन्मभुमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविद देवगिरी महाराज यांच्या वाणीतून शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा धकधकता इतिहस कथण केल्या जात आहे. या कार्यक्रमा दरम्यान गिता परिवार संस्थेच्यावतीने निलेश महाराज झरेकरे यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार गोविद देवगिरी महाराज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले उपस्थित होत्या. राज्यातील 47 हजार बंदी वादयाना भगवद्गीतेच्या माध्यमातून सुधारण्याचं काम केल्या बद्दल निलेश महाराज झरेकर यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार गौरवण्यात आले आहे.