बुलढाणा : रक्तदान महायज्ञा मध्ये २७००  पिशव्या रक्तसंकलीत

बुलढाणा : रक्तदान महायज्ञा मध्ये २७००  पिशव्या रक्तसंकलीत
  • Positive News
  • मार्च 14 2025

Share on  

बुलढाणा : रक्तदान महायज्ञा मध्ये २७००  पिशव्या रक्तसंकलीत

  जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित रक्तदान महायज्ञाचा समारोप 13 मार्च रोजी झाला. राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि वन बुलढाणा मिशनच्यावतीने ५ फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या रक्तदान महायज्ञाचा समारोप झाला. याअंतर्गत राज्यभर आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 2700 पिशव्या रक्त संकलित झाले आहे. यावेळी बोलतांना संदीप शेळके म्हणाले की, रक्तदान हे जीवनदान आहे. रक्ताचा एक थेंब गरजू रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. त्यामुळे रक्तदान चळवळ घराघरांत पोहचवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणार आहोत.अशी ग्वाही त्यांनी दिली.

संबंधित बातम्या