मुंबई | प्रतिनिधी
देशातील सुमारे ८ कोटी EPFO सदस्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी 8.25 टक्के व्याज लवकरच PF खात्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांना दिले आहेत.
EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) मार्च २०२६ मध्ये 8.25 टक्के व्याजदराला मंजुरी दिली होती. त्यानंतर जूनमध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालयाचीही अंतिम मंजुरी मिळाल्याने आता व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.
यावेळी EPFO ने आपल्या सॉफ्टवेअर प्रणाली आणि डेटाबेसचे आधुनिकीकरण केल्यामुळे व्याज जमा करण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक जलद होणार आहे. त्यामुळे सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम कमी वेळेत जमा होण्याची अपेक्षा आहे.
1. मिस्ड कॉलद्वारे :
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. काही क्षणांत SMS द्वारे PF शिल्लक मिळेल.
2. SMS द्वारे :
मोबाईलवर EPFOHO UAN ENG असा संदेश टाइप करून 7738299899 वर पाठवा. (इंग्रजीसाठी ENG; इतर भाषांसाठी संबंधित भाषा कोड वापरता येतो.)
3. UMANG ॲपद्वारे :
UMANG ॲपमध्ये EPFO सेवा निवडा, 'Employee Centric Services' → 'View Passbook' वर क्लिक करा. UAN आणि OTP टाकून पासबुक व शिल्लक पाहता येईल.
4. EPFO ई-पासबुक पोर्टलद्वारे :
EPFO च्या ई-पासबुक पोर्टलवर UAN, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन केल्यानंतर अद्ययावत PF शिल्लक तपासता येईल.
EPFO सदस्यांनी आपल्या खात्यातील व्याज जमा झाले आहे का, याची वेळोवेळी पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डिस्क्लेमर :
ही माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आणि विविध वृत्तस्रोतांवर आधारित असून केवळ माहितीच्या उद्देशाने सादर करण्यात आली आहे. अधिकृत माहितीसाठी EPFO च्या संकेतस्थळाला भेट द्या.