बीलिटल... एक प्रेरणादायी प्रवास ₹5,000 पासून ₹7.5 कोटींपर्यंतचा प्रवास – डॉ अंजली जाधव, ठाणे 

 बीलिटल... एक प्रेरणादायी प्रवास ₹5,000 पासून ₹7.5 कोटींपर्यंतचा प्रवास – डॉ अंजली जाधव, ठाणे 
  • Positive News
  • ऑगस्ट 14 2025

Share on  

 बीलिटल... एक प्रेरणादायी प्रवास ₹5,000 पासून ₹7.5 कोटींपर्यंतचा प्रवास – डॉ अंजली जाधव, ठाणे 

कधी कधी मोठी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मोठी भांडवलं लागत नाहीत, लागते ती फक्त जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा. 

बीलिटिल हा ब्रँड सुरू करणाऱ्या सूर्यप्रभा, साक्षिप्रियादर्शिनी आणि गायत्री या तीन मैत्रिणी तमिळनाडू राज्याच्या तिरुपुर जिल्ह्यातील आहेत. ते त्या जिल्ह्यातीलच राहतात आणि तिथल्या PSG कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, कोयम्बत्तूर मध्ये एकत्र शिक्षण घेत असताना त्यांची मैत्री झाली. त्यांच्या घरातून हे सुरूवातीचं उत्पादन घडू लागलं, आणि त्यांच्या हौशीचा आणि आत्मविश्वासाचा प्रवास अकल्पित यशाला घेऊन गेला. 

सुरुवात अशी केली:

2015 मध्ये, फक्त ₹5,000 गुंतवणूक आणि घराच्या एका छोट्याशा खोलीतून त्यांनी ‘Beelittle’ हा बेबी प्रॉडक्ट ब्रँड सुरू केला. त्यांची कल्पना होती – ऑर्गेनिक, सुरक्षित आणि नैसर्गिक घटकांवर आधारित बेबी प्रॉडक्ट्स तयार करणं.

संघर्ष आणि सुरुवातीचे दिवस

सूर्यप्रभा, साक्षिप्रिया आणि गायत्री यांनी 2015 मध्ये फक्त ₹5,000 गुंतवणुकीतून ब्रँड सुरू केला.

सुरुवातीला त्यांनी घरातल्या मशीनवर शिवणकाम करून उत्पादन तयार केलं.

मार्केटिंगसाठी मोठा बजेट नव्हता, त्यामुळे Word of Mouth आणि मित्रांच्या शिफारशींवर भर दिला.

बालकांसाठी योग्य, सुरक्षित आणि ऑर्गेनिक मटेरियल वापरण्यावर ठाम राहिल्या.

उत्पादनांची श्रेणी

आज त्यांच्या ब्रँडकडे 100 पेक्षा जास्त उत्पादनं आहेत, ज्यात —

नवजात व बाळांसाठी कपडे (ऑर्गेनिक कॉटन)

नवजात अॅक्सेसरीज (टोपी, मोजे, स्वॅडल्स)

गिफ्ट सेट्स

सस्टेनेबल प्रॉडक्ट्स (पर्यावरणपूरक पॅकेजिंग)

डिजिटल विस्तार

2019 मध्ये त्यांनी स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट सुरू केली.

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन विक्री 70% पर्यंत वाढली.

Amazon, FirstCry सारख्या मार्केटप्लेसवर उपस्थिती.

सोशल मीडियावर (Instagram, Facebook) क्रिएटिव्ह प्रॉडक्ट फोटोग्राफी आणि ग्राहकांशी संवाद हा त्यांचा ताकदीचा भाग आहे.

 सामाजिक प्रभाव
स्थानिक महिला कारागिरांना रोजगार देऊन आर्थिक स्वावलंबनाची संधी.

नैसर्गिक कापड वापरून पर्यावरणपूरक दृष्टिकोन.

ग्रामीण भागातील लहान युनिट्ससोबत भागीदारी करून उत्पादन वाढवणे.
 यशाचा वळणबिंदू:

पहिली काही वर्षं त्यांनी कमी खर्चात, फक्त ग्राहकांच्या विश्वासावर व्यवसाय उभा केला. कोणताही जाहिरातीचा मोठा खर्च न करता Word of Mouth ने  नाव कमावलं.
2019 मध्ये त्यांनी स्वतःची वेबसाइट सुरू केली, आणि लॉकडाऊनच्या काळात डिजिटल विक्रीने त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली.

आजची स्थिती:

वार्षिक उलाढाल: ₹7.5 कोटी रुपये

100+ उत्पादनं बाजारात

35 सदस्यांची टीम

चेन्नईसह इतर शहरांमध्ये दुकानं

70% ऑर्डर्स ऑनलाइन

यशाचं सूत्र:

1. सर्जनशील कल्पना – स्पर्धेच्या जगात   वेगळं ठरणारी उत्पादनं.

2. विश्वासावर आधारित ब्रँडिंग – ग्राहकांच्या आवडींना प्राधान्य.

3. डिजिटल सामर्थ्याचा वापर – वेबसाइट, सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स.

4. टीमवर्क – तीन मैत्रिणींची एकत्रित मेहनत आणि उद्दिष्टांप्रती निष्ठा.

 प्रेरणादायी संदेश: “मोठं भांडवल नाही म्हणून स्वप्नं लहान करू नका; योग्य दिशा, मेहनत आणि जिद्द असेल तर काहीही शक्य आहे.”
 

संबंधित बातम्या