अशोक सराफ म्हणतात ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे सिनेमा धोक्यात ....
मराठी इंडस्ट्री किंवा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री हे कुठेन कुठे मागे पडली आहे का? कारण की ओटीटी प्लॅटफॉर्म आले आहेत. नेटफ्लिक्स किंवा वेगवेगळ्या ज्या ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत. ज्यामध्ये सिरीजचा एक वर्ल्ड आला आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक चित्रपट पाहण्यासाठी या ओटीटी फ्लॅटफॉर्मचा वापर करताना दिसत आहेत. घरात बसून लोकं यावर चित्रपट किंवा सिरीज बघताना दिसत आहेत. यावर बोलताना अशोक सराफ यांनी म्हटलं आहे की, मुळात अशी गोष्ट झाली आहे की, ओटीटीवर कोणताही चित्रपट किंवा सिरीज ही घरात बसून बघायला मिळते. आपल्या वेळेनुसार ओटीटीवर चित्रपट किंवा इतर कोणत्याही गोष्टी बघायला मिळत असल्यामुळे ते प्रसिद्ध होणारच ना. चित्रपटांचं कसं आहे की, चित्रपट पाहण्यासाठी वेळ पाळावी लागते. त्या ठिकाणी तुम्हाला वेळेवर पोहोचावे लागते. त्याचबरोबर तिथे जावून तिकीट काढावं लागतं. त्यामुळे ओटीटीवर तस काही होत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे ओटीटीवर ज्या सिरीज बनतात त्या इतक्या लिमिटेड असतात आणि इतक्या बांधीव असतात की त्या लोकांना आवडणं हे निश्चित आहे. मात्र, चित्रपटाचं तस होत नाही. चित्रपटाची कथा ही छान असेल तर लोकांना आवडते. जर चित्रपटाची कथा ही खूप लांब असेल आणि ती जर प्रेक्षकांना नाही आवडली तर चित्रपट फ्लॉप होतात.