“Art Of Letting Go....सोडून देण्याची कला – मनाची खरी मुक्ती”- डॉ . अंजली जाधव 

“Art Of Letting Go....सोडून देण्याची कला – मनाची खरी मुक्ती”- डॉ . अंजली जाधव 
  • Positive News
  • जून 10 2025

Share on  

“Art Of Letting Go....सोडून देण्याची कला – मनाची खरी मुक्ती”- डॉ . अंजली जाधव 

"Letting go" म्हणजेच सोडून द्यायचे किंवा माफ करून पुढे जायचे हा एक सुंदर आणि सखोल विषय आहे.
आपल्या जीवनात बऱ्याच वेळा आपण अशा आठवणी, भावना, किंवा माणसं पकडून ठेवतो ज्या आपल्याला वेदना देतात. जरी ते नाते दुरावले असेल, तरी मन त्यांना सोडायला तयार नसतं. आणि यामुळे आपण अडकतो – दुखात, रागात, भीतीत. "Letting go" म्हणजेच हे ओझं हलकं करणं – स्वतःसाठी.

सोडून देणं म्हणजे इतरांशी नातं तोडणं नाही, तर स्वतःच्या अंतर्मनाशी मैत्री करणं आहे.

सोडून देणं का आवश्यक आहे?

* मन:शांती मिळवण्यासाठी

* नकारात्मक भावना आणि मानसिक आजारांपासून दूर राहण्यासाठी

* पुढे जाण्यासाठी आणि स्वतःला विकसित करण्यासाठी

नवीन पिढीसाठी तर लेटिंग गो आत्मसात करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण सध्या लहान मुले आणि युवकांमध्ये आत्महत्या करण्याकडे कल वाढलेला दिसतो. या पाठीमागची कारणे खूप क्षुल्लक असतात जसे की प्रेमभंग, शाळेमध्ये झालेला अपमान, लक्ष्य प्राप्त करण्यामध्ये मिळालेले अपयश या व अशा अनेक लहान सहान कारणावरून त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत राहतात. ही पिढी खूपच लवकर निराश होताना दिसते आणि त्यातूनच वाईट पावले उचलली जाऊ शकतात. त्यांनी निराशेच्या आहारी जाऊ नये म्हणून या पिढीने आर्ट ऑफ लेटिंग गो शिकणे आवश्यक आहे.
यामध्ये पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. आपले मूल एखादी गोष्ट साध्य करू शकले नाही तर त्याबाबतीत त्याला दोष देण्याऐवजी, त्याची तुलना इतरांशी करण्याऐवजी त्याला प्रेमाने समजावणे योग्य राहील. यावेळी तू काही गोष्टी साध्य करू शकला नाहीस तर पुढच्या वेळी जास्त कष्ट कर आणि तुला या गोष्टी निश्चित मिळतील असे समजावणे गरजेचे आहे . किंवा अमुक एक व्यक्ती तुझ्यासाठी योग्य नव्हतीच म्हणून ती तुझ्यापासून दुरावली.

आता हे कसं करता येईल हाच मोठा प्रश्न असतो कारण कळतंय पण वळत नाही ही आपल्या सर्वांचीच स्थिती असते
उपाय:
* स्वतःशी प्रामाणिक संवाद करायला शिका

* ध्यान / मेडिटेशन करा

* आधी स्वतःला माफ  आणि  मग इतरांनाही माफ करा

* निसर्गाशी जास्तीत जास्त नातं जोडायला शिका.

* Gratitude म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करायला कमीपणा मानू नका.
* स्माईल मुद्रा मेडिटेशन करा....यासाठी आपण एखाद्या तज्ञांचा सल्ला घ्यावा कारण या मुद्रांमध्ये तुमच्या स्ट्रेसचे मुख्य कारण जाणून घेऊन मुद्रा दिली जाते.
* स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी तज्ञ व्यक्तीकडून मर्मथेरपी घेणे . यामध्ये प्राणमर्म आणि न्यूरोमर्म उत्तम रित्या काम करतात.

असं कोणीतरी सांगितलं सोडून द्या म्हणून ते लगेच शक्य होत नाही,सोडून देणं हा एक प्रवास आहे. दररोज थोडं थोडं करत गेलं की अंतर्मन मोकळं होतं. नात्यांमधला राग, स्वतःबद्दलची निराशा, भूतकाळातील दुःख — हे सगळं सोडून दिलं की आपण आत्ताच्या क्षणात जगायला शिकतो. आणि तिथेच खरी "मुक्ती" आहे

कदाचित काही जणांची letting go आणि Giving Up यामध्ये गफलत होऊ शकते.
"Letting Go" आणि "Giving Up" या दोन शब्दांमध्ये सूक्ष्म पण खूप महत्वाचा फरक आहे. दोघांमध्ये 'सोडून देणं' हे स्वरूप असलं तरी त्यामागचं दृष्टीकोन आणि उद्दिष्ट वेगळं असतं.

 

  Letting Go (सोडून देणं):

  म्हणजे सकारात्मक भावनेने, शांत मनाने, काहीतरी मागे सोडणं — कारण ते आता तुझ्यासाठी योग्य नाही.
 हे एक प्रकारचं समजुतदार आणि परिपक्वतेचं लक्षण आहे.

उदाहरणार्थ: 
* भूतकाळातील दुखावलेपण सोडणं
* अपयश स्वीकारून नव्या वाटा शोधणं
* नात्यातल्या अपेक्षा सोडून देणं, पण प्रेम टिकवणं 

"Letting go is self-care, not surrender."
 

Giving Up (हा मानणं / सोडून देणं):
* म्हणजे एखाद्या गोष्टीपासून हात झटकणं कारण आपल्याला वाटतं आपण यशस्वी होऊ शकत नाही.
 यामध्ये बहुतेकदा नकारात्मक भावना असते — भीती, निराशा, थकवा.

उदाहरणार्थ:

* एखादा स्वप्न पूर्ण न करता सोडणं कारण वेळ लागतोय
* नातं जपायचा प्रयत्न न करता सोडून देणं
* एखादं ध्येय अधूरं टाकणं कारण  "मी नाही करू शकत" अशी भावना असणे 

"Giving up is quitting, letting go is choosing peace."


 थोडक्यात फरक:

Letting Go (सोडून देणं)    Giving Up (हार मानणं)

आत्मिक शांततेसाठी    स्वतःवर विश्वास ठेवून
सकारात्मक निवड करणे, नवीन दिशा स्वीकारणे म्हणजे letting go 
हे एक परिपक्वतेचे लक्षण आहे.

तर स्वतःवरचा विश्वास गमावून, प्रयत्न थांबवणे,     नकारात्मक पलायन करणे म्हणजे Giving Up .
हे नकारात्मकतेचे लक्षण आहे 


असे म्हटले जाते की काळामध्ये प्रत्येक घाव भरण्याची शक्ती असते. काळ हा प्रत्येक जखमेवरचे औषध असतो. म्हणूनच कोणत्याही अवघड काळी थोडासा वेळ जाऊ द्या,  काळ जाता जाता सगळे ठीक होऊन जाईल. 
लक्षात ठेवा.....
सोडून देणं ही एक शक्ती आहे हार नाही , 
जे काही आपल्यासाठी योग्य नाही ते शांतपणे सोडून देणे हाच खरा मानसिक विकास आहे


      Smile Back to Life – Emotional Healing with Anjali Jadhav
      9987553410

     www.smilesujok.in
 

संबंधित बातम्या