ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना एआय प्रशिक्षण 

ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना एआय प्रशिक्षण 
  • Positive News
  • एप्रिल 17 2025

Share on  

ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना एआय प्रशिक्षण 

सध्या सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या तंत्रज्ञानाची चर्चा सुरू आहे. हे तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात पोहोचले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली आहे. प्रशासकीय कामकाजातदेखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास कामाला गती मिळेल, या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी विशेष कंपनींची निवड करण्यात आली असून त्या कंपनीचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. 

यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता यावर अत्यंत उपयोगी व दर्जेदार प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाचा शासकीय कामकाजात उपयोग होणार आहे. कमी वेळेत जास्तीत-जास्त काम करण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत होईल. तसेच कामांमध्ये पारदर्शकता येण्याच्या

दृष्टिकोनातून उपयोगी तंत्रज्ञान आहे.  असे कनिष्ठ सहाय्यक लेखा, अर्थ विभाग
 गंगाधर बोरकर यांनी सांगितले. 
तर १०० दिवसांचा कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांनी काम करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्यांच्या कामाला गती मिळेल. कामकाजात गती, पारदर्शकता आणण्यासह लोकोपयोगी कामे उत्तमरीत्या करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. या प्रशिक्षणामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामात येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर होण्यास मदत झाली आहे असे 

सामान्य प्रशासन विभाग-  उपमुख्य कार्यकारी अधिकारी,  अविनाश फडतरे म्हणाले. 
१०० दिवसांच्या कृती आराखड्या अंतर्गत मंगळवारी बीजे हायस्कूल येथे कृत्रिम बुद्धिमत्ता या

विषयावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात काग्निडॉल्फ कंपनीचे संस्थापक मयूर तांबे आणि क्लाऊडटेल्स कंपनीचे सहव्यवस्थापक स्वप्निल बावा यांनी कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे, त्यावर काम करण्याची पद्धत, हे तंत्रज्ञान हाताळण्याची प्रक्रिया असे सर्व तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. या वेळी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण आत्मसात करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. हे तंत्रज्ञान वापरण्यासंदर्भात आणखी अडचणी येत असल्यास त्या दूर करण्यासाठी पुन्हा एकदा प्रशिक्षण वर्ग घेऊ, असे आश्वासनदेखील घुगे यांनी या वेळी कर्मचाऱ्यांना दिले.

संबंधित बातम्या