एक नजर त्यांच्या कामावर

एक   नजर  त्यांच्या कामावर
  • Positive News
  • एप्रिल 29 2025

Share on  

एक नजर त्यांचा कामावर 


मी काही महिन्यापुर्वी छावा हा चित्रपट  बघितला. चित्रपटातून आपणास अनेक अज्ञात बाबी समजतात.त्याबद्दल चित्रपट निर्मात्या रवी कौशीकचे मानावे तितके आभार कमीच आहे. त्याच्यामुळे मराठ्यांचा ज्वाजल इतिहास समस्त देशवासीयांच्या समोर आला.या चित्रपटाविषयी अनेकांनी भरभरुन लिहल्याने त्याविषयी मी काही जास्त बोलणार नाही.तितकी माझी पात्रता देखील नाही मला तूमचे लक्ष वेधून घेण्याचे आहे.कोणताही चित्रपट संपल्यावर चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यावर गुंतलेल्या व्यक्तींची जी यादी येते त्याकडे 
          माझे असे निरीक्षण आहे की बहूसंख्य जण चिञपट संपल्यावर येणाऱ्या श्रेयावलीकडे साफ दूर्लक्ष करतात चिञपट तयार करणे हे सांघीक कार्य आहे आपल्यास पडद्यावर जितके लोक दिसतात त्याचा तुलनेत अधिक लोक पडद्यामागे कार्यरत असतात त्याचा कामाची दखल घेण्यासाठी चिञपटाची सांगता झाल्यावर दाखवण्यात येणारी श्रेयावली किमानपक्षी डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे असे माझे प्रामाणीक मत आहे 
                 त्यातील काही जणांना विविध पुरस्कार देवून जरी गौरविण्यात येत असले तरी ती काहीसी उशीरा घेतलेली दखल असते त्यांची योग्यवेळी दखव घेण्याचा मार्ग म्हणजे चिञपट रसिकाने ती श्रेयावली किमानपक्षी डोळ्याखालून घालणे हा होय आणी आपल्याला पडद्यावर दिसणार्या व्यक्तीची आपणास सहजतेने ओळख होते माञ हे भाग्य दूर्दैवाने पडद्यामागील व्यक्तीना मिळत नाही बहूसंख्य वेळेस त्यांची ओळख आपणास पुरस्करादरम्यानच होते आणि  या पडद्यामागील प्रत्येक कलावंतास पुरस्कार मिळतोच असा नाही सबब प्रत्येक चिञपटाचा या पडद्यामागील कलावंताची ओळख होतेच असही नाही                       
  चिञपट तयार करण्यात या व्यक्तीचा सहभाग मोठ्या प्रमाणात असूनही पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या प्रतीभेतून साकारलेल्या हरीतात्या या व्यक्तीचा स्वाभाववैशिष्ठाप्रमाणे यांचे चिञपट निर्मितीतील योगदान पुराव्यानी साबीत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चिञपटाचा अखेरीस येणारी ती श्रेयावली होय तरी आपण ती श्रेयावली बघायलाच हवी मी स्वत:हा ती बघतो आणी हे फक्त या बाबतीतच होते असे नाही कितीतरी ठिकाणी ही पडद्यामागील व्यक्ती पडद्यामागेच राहतात त्याचे योगदान आपण विसरायला नको मी एका व्रुतपञाच्या रविवार च्या विशेष पुरवणीत  चिञपटस्रुष्टीतील अश्या कलावंताच्या प्रश्नांविषयी लिहून आले होते ते वगळता त्यांचा प्रश्नाविषयी फारशा आवाज उठवलेला मला तरी दिसलेला नाही 
                                  या वर्गाविषयी आपण किमानपक्षी त्याची नावे डोळ्याखालून घालून सहानभुती व्यक्त करू शकतो बहुसंख्य प्रसंगी जे पडद्यावर दिसतात अश्या व्यक्तीकडून या वर्गाबाबत फारशा आदर्श द्रुष्टीकोन ठेवला जात नाही जे अयोग्य आहे असो माञ सध्या या मतप्रवाहात बदल होत आहे जी गोष्ट स्वागतार्ह आहे या विषयी खुप काही लिहण्यासारखे आहे पण तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत राम राम

अजिंक्य तरटे 
9552599495
9423515400

संबंधित बातम्या