तुमचा चेहरा सांगतो तुमच्या शरीरातील समस्या - डॉ अंजली जाधव, ठाणे
एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहिला की ती व्यक्ती निरोगी आहे की तिच्यामध्ये काही आजार आहेत याची थोडीशी कल्पना आपल्याला येऊ शकते. चेहऱ्याच्या विविध भागांवरील लक्षणांवरून शरीरातील आरोग्यदायक समस्या ओळखून आपण वेळीच उपाय करू शकतो .
तुमचा चेहरा तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो हे आपण पाहुयात.
1. गडद काळसर वर्तुळे (Dark Circles)
कारणं:
आयर्न (लोहतत्त्व) किंवा जीवनसत्त्वांची कमतरता,
ॲलर्जी,
सायनस त्रास
अपुरी झोप
स्ट्रेस
उपाय: लोहतत्त्वयुक्त आहार (पालक, बीट), जीवनसत्त्व C आणि झिंकयुक्त पदार्थ, पुरेशी झोप.
---
2. चेहऱ्यावर लालसरपणा (Red Skin)
कारणं:
उच्च रक्तदाब
रोझेशिया (rosacea) नावाचा त्वचाविकार
यकृत (लिव्हर) समस्या
उपाय: रक्तदाब नियंत्रणात ठेवणे,
तळलेले आणि मसालेदार अन्न कमी करणे,
यकृत स्वच्छ करणारा आहार (उदा. आवळा, ग्रीन टी, फळे पालेभाज्या ताजे सात्विक अन्न).
रागावर नियंत्रण
---
3. पिवळसर त्वचा (Yellowish Skin)
कारणं:
अॅनिमिया (रक्ताल्पता),
लोहतत्त्वाची कमतरता,
शरीरातील रक्तप्रवाह कमी होणे
उपाय: लोहतत्त्व आणि जीवनसत्त्व B12 युक्त आहार (डाळी, सुकामेवा, गूळ).
---
4. ओठ सुकणे किंवा फाटणे (Cracked Lips)
कारणं:
जीवनसत्त्व B चा अभाव
शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन)
ऍसिडिटी, अपचन
उपाय: भरपूर पाणी प्यावे, B कॉम्प्लेक्स (सुपर फूड्स: अंजीर, साळीचे धान्य)
---
5. चेहऱ्यावर मुरुम (Acne)
कारणं:
हार्मोन्समध्ये असंतुलन (मासिक पाळीपूर्वी)
पोट साफ न होणे,
चुकीचा आहार (तेलकट, साखरयुक्त)
पाण्याचे कमी प्रमाण
फायबर युक्त आहाराची कमतरता
उपाय: शांत आणि योग्य प्रमाणात झोप, साखर-तेल कमी करणे, वात-पित्त संतुलित ठेवणारा आहार.
---
6. चेहऱ्यावर केस येणे (Facial Hair)
कारणं:
PCOS/ PCOD (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम/ डिसऑर्डर)
हार्मोनल असंतुलन
रजोनिवृत्तीचा कालावधी
उपाय: PCOS साठी योग्य आहार (साखर कमी, फायबर जास्त), व्यायाम, योग आणि त्रिदोष संतुलन.
---
7. डोळ्याभोवती सुज येणे (Puffiness or Swelling)
कारणं:
मूत्रपिंडाशी संबंधित समस्या, फुफ्फुसाचे संसर्ग,
हार्मोन्समध्ये बदल
ॲलर्जी
उपाय: मीठ कमी करणे, अन्नातील ॲलर्जीकारक घटक ओळखणे, मूत्रवर्धक नैसर्गिक उपाय (उदा. गवती चहा, कोथिंबीर काढा).
---
8. कपाळावरील त्वचेचा काळपटपणा
कारणे: भरपूर ताण तणाव आणि विश्रांतीचा अभाव
उपाय: योग, ध्यानधारणा, प्राणायाम करणे, स्माईल मुद्रा मेडिटेशन करणे.
रात्री वेळेवर झोपून 7 तासांची झोप घेणे.
.........................
विशेष टीप:
तुमच्या चेहऱ्यावरील ही लक्षणं ही शरीराच्या अंतर्गत अवयवांची आणि भावनिक स्थितीचीही खूण असू शकतात. Smile Mudra Meditation आणि नैसर्गिक उपायांचा वापर करून या लक्षणांवर प्रभावीपणे काम करता येते.
डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपल्या चेहऱ्यावर अशी काही लक्षणे आढळून येत असल्यास योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.