असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य १९ सप्टेंबर २०२५

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य १९ सप्टेंबर २०२५
  • Positive News
  • सप्टेंबर 19 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य १९ सप्टेंबर २०२५
शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५. भाद्रपद कृष्ण त्रयोदशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

आज वर्ज्य दिवस आहे. प्रदोष

 चंद्रनक्षत्र - आश्लेषा (बुध)/ (सकाळी ७.०६ नंतर) मघा(केतू).  आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क/(सकाळी ७.०६ नंतर) सिंह. (नक्षत्र गंडांत) 

१९ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर रवी आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचाजन्म चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात होतो.  तुमच्यात एकाग्रता कमी असल्याने शिक्षणात अडथळे येऊ शकतात. मात्र तुम्हाला संशोधन करण्याची आवड असते.  तुमचं स्वभाव तापट आणि हेक्त असू शकतो. स्वभाव उतावळा असल्याने प्रेमप्रकरणात अपयश येऊ शकते. तुम्हा अधिकार आणि प्रतिष्ठा मिळतात. इतरांची लुडबुड तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही इतरांची परीक्षा उत्तमपणे करू शकतात. मित्र आणि नातेवाईक यांच्या गुप्त गोष्टी तुम्ही बाहेर बोलत नाहीत. तुमचा सल्ला व्यावहारिक असतो. घराकडे फारसा ओढा नसतो. तुमच्या कामात तुम्ही अभयसू असतात. तुमचा स्वभाव  धडपड्या, बढाईखोर आणि अति महत्वाकांक्षी असतो. व्यवसायात आणि नोकरीत तुम्हाला उत्तम यश मिळते. इतरांकडून तुम्हाला योग प्रतिसाद मिळत नाही. तुमची अभिरुची अत्यंत उच्च असते. तुम्ही हुशार, बुद्धिमान, शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे. तुमचा कामाचा झपाटा मोठा असतो. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून क्रीडा प्रकारांची आवड आहे. स्वतःचे विचार तुम्ही मित्रांना उत्तम प्रकारे समजून सांगू शकतात. एखाद्या कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्या आवडतात. तुम्ही एक कलाकार आहात आणि जीवनाच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला ओढ आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. नीती अनीती आणि परंपरा याच्या कल्पना तुमच्या जरा वेगळ्या असतात. तुम्ही सतत उद्योगप्रिय असतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे तुम्ही इतरांचा आदर करतात. इतरांच्या गुप्त गोष्टींचा तुम्ही बाहेर उच्चार करत नाहीत. तुमच्याशी सल्लामसलत केल्यास तुमचे मित्र निराशा आणि तणाव यापासून मुक्त राहतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये तुम्ही मिसळतात. तुम्ही फारसा सखोल अभ्यास करत नाहीत मात्र वक्तृत्व चांगले असते. तुमच्या संशोधनातून जगाला फायदा होतो. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तुमचे व्यक्तिमत्व दुहेरी आहे. तुम्ही एकाच वेळी व्यवहारी देखील असतात आणि ध्येयवादी सुद्धा असतात. मोठेपणा आणि प्रसिद्धी याची हाव टाळली पाहिजे. 
     

व्यवसाय:-  जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्माते, चित्रपट दिग्दर्शक, स्टुडिओ मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, बँकिंग, औषध, वैद्यकीय क्षेत्र, वकील.

शुभ दिवस:- रविवार आणि गुरुवार.

शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, नारंगी आणि जांभळा.

शुभ रत्न:- पाचू आणि माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमचा मूळचा स्वभाव धाडसी आणि कार्यतत्पर आहे. आज ग्रहमान अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीसाठी आज मनसोक्त खर्च कराल. मनासारख्या घटना घडतील. प्राणयरम्य दिवस आहे. प्रेमविवाह इच्छुकांना आज चांगली बातमी समजू शकते. मात्र उतावीळपणा टाळावा.  
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) 
तृतीय आणि चतुर्थ चंद्र आहे. घरात आज नक्क्कीच काहीतरी नवीन वस्तू आणाल किंवा मनासारखे बदल कराल. व्यवसायात अरहीक लाभ होणार आहेत. जुनी येणी वसूल करण्यासाठीअनुकूल दिवस आहे तुम्ही मागून तर बघा.  . 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आज सुखकारक दिवस आहे. मन आनंदी रहाणार आहे. तुमची विनोदबुद्धी आज विशेष खुलणार आहे. त्यामुळे काही जणांना तुमचा मत्सर वाटणार आहे मात्र त्याकडे आज तुम्ही लक्ष देणार नाही. व्यय स्थानातील हर्षल मात्र आज तुमच्या कामात अडथळे आणू शकेल. यावर उपाय म्हणजे श्री. हनुमान उपासना करा. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सकाळी जरी चंद्र तुमच्या राशीत असला तरी नंतर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तुमच्यातील कलागुणांना आज चांगलाच बहर येणार आहे. तुमचा स्वभाव अत्यन्त काटकसरी आहे. आज अर्थी लाभ झाल्याने तुमची कळी खुलणार आहे. त्यातच मित्राकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते.    
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सकाळी आठ नंतर तुमचे ग्रहमान अनुकूल होणार आहे. प्रिय व्यक्तीसोबत आज भटकंती करायला मिळणार आहे. मन प्रसन्न असणार आहे. भावंडांकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते. मात्र नोकरीच्या ठिकाणी विनाकारण काहीतरी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काहीसे अवस्थ होऊ शकतात.     
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्या व्यय स्थानी चंद्र आहे. त्यामुळे मनावर काहीसा तणाव राहणार आहे. खर्च वाढणार असला तरी आज ग्रहमान चांगले आहे. मग कशाला काळजी करता? चंद्र शुक्र युती तुम्हाला प्रिय व्यक्तीसाठी खर्च करण्यास भाग पाडेल.      
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज अगदी आनंददायक ग्रहमान आहे. चंद्र शुक्र अनुकूल आहेत. मनाची एकाग्रता वाढवणारा दिवस आहे. नवनवीन शोध लावण्यास उत्तम कालावधी आहे. आजचा दिवस तुम्ही तुमच्या मनासारखा व्यतीत कराल. मात्र वाहन चालवताना काळजी घ्या.   
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आजचा दिवस मध्यम प्रतीचा आहे. बदलत्या ग्रहमानाचा आनंद घ्या. तुम्ही कायम तणावात राहू नका. आज भिन्न लिंगी व्यक्तीकडून तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. मात्र खर्च वाढणार आहे.   
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुम्हाला काहिनाकाही छंद असतोच. अनेकदा हा छंद इतरांना विक्षिप्त वाटू शकतो. मात्र तुम्हाला त्याची फिकीर करण्याची गरज नसते. आजतुम्ही आवडत्या छंदात रममाण व्हाल. वाहनसुख लाभे. नाते गोते जमा कराल.    
  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्या अष्टमस्थानी चंद्र आहे. मात्र काळजीचे कारण नाही. आर्थिक लाभ भरपूर होणार आहेत. त्यासाठी आज तुम्हाला अधिक कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल. आर्थिक गुंतवणूक मात्र अडचणीत येण्याची शक्यता आहे.  

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या सप्तम स्थानी चंद्र आल्याने तुम्हाला काहीसे हायसे वाटेल. ग्रहमान अनुकूल आहे. पत्नीचे हट्ट आज पुरवावे लागतील. ज्यांच्यासाठी तुम्ही कायम श्रम केले, त्यांचे भले केले, त्यांच्याकडून निराशा होईल. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) षष्ठ स्थानी चंद्र येत आहे. व्यावसायिक लाभ वाढणार आहेत. महिलांकडून सहकार्य लाभेल. अष्टम मंगळ आज फारसा प्रतिकूल वाटणार नाही. तुमच्यावर इतरांनी केलेले उपकार तुम्ही विसरू नका. विनाकारण शत्रुत्व घेऊ नका. स्तुतिप्रियता टाळा.  

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या