असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य बुधवार, ४ मार्च २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य बुधवार, ४ मार्च २०२६
  • Positive News
  • मार्च 4 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य बुधवार, ४ मार्च २०२६

फाल्गुन कृष्ण प्रतिपदा
चंद्र नक्षत्र – पूर्वा (सकाळी ७.३९ पर्यंत)/ नंतर उत्तरा.
राशी – सिंह (दुपारी १.४६ पर्यंत)/ नंतर कन्या.
करी दिन. *अभ्यंग स्नान. वसंतोत्सव प्रारंभ.*
वर्ज्य दिवस.
चंद्र प्रतियुती शुक्र, 
चंद्र प्रतियुती शनी, 
चंद्र त्रिकोण हर्षल, 
चंद्र प्रतियुती नेपच्यून, 
शुक्र लाभ हर्षल.

४ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर गुरूचा प्रभाव आहे.  तुमच्या आयुष्यात अनपेक्षित चढउतार होतात. तुमच्या आयुष्यात चळवळी होतात. आणि गतिमान असते. आयुष्यामध्ये उत्साहवर्धक आणि चांगले अनुभव येतात. तुम्ही झटपट विचार करतात आणि त्वरित निर्णय घेतात. तुमच्या बुद्धीचा आणि कृतीचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी होतो. तुम्ही रूढी आणि बंधने यांना फारसे महत्त्व देत नाहीत. व्यक्तिमत्व आकर्षक असते. खोटेपणा तुम्हाला आवडत नाही. इतरांवर तुम्ही तुमचे विचार लादत असतात. सतत विरोध करण्याच्या किंवा वाद घालण्याच्या वृत्तीमुळे तुम्हाला गुप्त शत्रू निर्माण होतात. तुमच्याबद्दल गैरसमज पसरतात. आत्मविश्वास चांगला असतो. तुम्ही स्वतःचे विचार आणि कल्पना ठामपणे मांडू शकतात. बऱ्याच वेळेला तुम्ही हातचे राखून ठेवणे पसंत करतात. इतरांना मनमोकळेपणे काही सांगत नाहीत. काही वेळा तुम्ही चाकोरी बाहेर जाऊन इतरांना मदत करतात. सामाजिक जीवनात तुम्ही कार्यरत असतात. जीवनात सतत बदल असावा असं तुम्हाला वाटतंय. तुमचा मित्र परिवार देखील कायम बदलत असतो. झटपट पैसा मिळावा असे तुम्हाला वाटते. तुम्हाला घरातील लोकांपासून आणि नातेवाईकांपासून त्रास होतो.

व्यवसाय:- इंजिनीअर, बांधकाम, शास्त्रज्ञ,, व्यावसायिक, कारखानदार,जाहिरात, गृह सजावट, बौद्धिक क्षेत्र, आयात - निर्यात.

शुभ दिव:- रविवार, सोमवार, शनिवार.  

शुभ रंग - निळा, राखाडी, पांढरा, लाल.

 मेष (Aries)
आज भावना आणि व्यवहार यामध्ये संघर्ष जाणवेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. सर्जनशील कामात यश मिळेल. जोडीदाराशी सौम्य संवाद ठेवा.

 वृषभ (Taurus)
घरगुती वातावरणात थोडी अस्थिरता जाणवेल. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा. कामात नव्या कल्पनांना संधी मिळेल.

 मिथुन (Gemini)
विचारांची गती वाढेल. मित्रपरिवारातून अनपेक्षित मदत मिळेल. प्रवास टाळावा. प्रेमसंबंधात संयम आवश्यक.

 कर्क (Cancer)
आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. खर्च वाढू शकतो. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल.

 सिंह (Leo)
सकाळी राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल, पण अहंकार टाळा. वर्ज्य दिवस असल्याने नवीन काम सुरू करू नका. आध्यात्मिक कार्यात मन रमवा.

 कन्या (Virgo)
दुपारनंतर चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करेल. मानसिक स्पष्टता वाढेल. कामात बारकाईने लक्ष द्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

 तुळ (Libra)
मित्रांसोबत वेळ घालवाल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. परंतु भावनिक निर्णय टाळा.

 वृश्चिक (Scorpio)
करिअरमध्ये ताण वाढू शकतो. वरिष्ठांशी सौम्य वागा. गुप्त योजना सध्या पुढे ढकला.

 धनु (Sagittarius)
भाग्याची साथ मिळेल. सर्जनशील कामात प्रगती होईल. प्रवासाचा विचार पुढे ढकला.

 मकर (Capricorn)
आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.

 कुंभ (Aquarius)
संबंधांमध्ये स्पष्टता आवश्यक. भागीदारीत सावधगिरी बाळगा. नवीन कल्पनांना उत्तम प्रतिसाद मिळेल.

 मीन (Pisces)
कामाचा ताण वाढेल पण परिणाम समाधानकारक राहतील. कलात्मक कार्यात यश. प्रेमसंबंधात मधुरता वाढेल.

ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

संबंधित बातम्या