असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य गुरुवार, १५ जानेवारी २०२६.

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य गुरुवार, १५ जानेवारी २०२६.
  • Positive News
  • जानेवारी 15 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य गुरुवार, १५ जानेवारी २०२६.
पौष कृष्ण द्वादशी / त्रयोदशी.
विश्वावसुनाम संवत्सर.
शके १९४७, संवत २०८२.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क – 8087520521)

राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.००

“आज करी दिन – वर्ज्य दिवस आहे”

नक्षत्र – ज्येष्ठा (दिवसभर)
चंद्रराशी – वृश्चिक

शुक्र लाभ शनी, शुक्र त्रिकोण हर्षल

 मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

आज संयम ठेवणे गरजेचे आहे. कामात विलंब होऊ शकतो. वरिष्ठांशी मतभेद टाळा. आर्थिक व्यवहार पुढे ढकललेले बरे. संध्याकाळनंतर थोडा दिलासा मिळेल.

 वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

कुटुंबात जबाबदाऱ्या वाढतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. करी दिन असल्याने नवीन काम टाळा. कला व सौंदर्य विषयक कामात मात्र समाधान मिळेल.

 मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

बोलताना जपून बोला. गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. शुक्र-हर्षल योगामुळे कल्पकतेला वाव मिळेल. लेखन, जाहिरात, मीडिया क्षेत्रासाठी चांगला दिवस.

 कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

घरगुती प्रश्न डोके वर काढू शकतात. मानसिक अस्थिरता जाणवेल. वर्ज्य दिवस असल्याने महत्त्वाचे निर्णय टाळावेत. ध्यान, प्रार्थना उपयुक्त ठरेल.

 सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. सहकाऱ्यांशी संयमाने वागा. अचानक बदल संभवतात. संध्याकाळनंतर परिस्थिती अनुकूल होईल.

 कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

प्रवास टाळलेला बरा. आरोग्याकडे लक्ष द्या. शुक्र लाभ शनीमुळे मेहनतीचे फळ मिळेल, पण विलंबाने. संयम ठेवा.

 तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक. गुंतवणूक किंवा उधारी टाळा. नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवल्यास तणाव कमी होईल.

 वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

चंद्र तुमच्या राशीत असल्याने भावनिकता वाढेल. निर्णय घेताना घाई करू नका. करी दिन असल्याने नवीन सुरुवात टाळावी. आत्मपरीक्षणासाठी योग्य दिवस.

 धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. कामाचा ताण वाढेल. शुक्र-हर्षल योगामुळे नवीन कल्पना सुचतील, पण अंमलबजावणी पुढे ढकळा.

 मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

विद्यार्थ्यांसाठी दिवस मध्यम. अभ्यासात एकाग्रता कमी राहील. सर्जनशील कामात मात्र यश मिळेल. संयम आणि शिस्त आवश्यक.

 कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

घर, जमीन, वाहन विषयक चर्चा होऊ शकते. निर्णय घेण्यास वेळ घ्या. मन अस्थिर राहील, पण संध्याकाळनंतर शांतता लाभेल.

 मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

संवादकौशल्य चांगले राहील. लेखन, कला, संगीत क्षेत्रात प्रगती संभवते. वर्ज्य दिवस असल्याने मोठे व्यवहार टाळा.

— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 8087520521

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, विवाह, स्वभाव, भाग्योदय, आरोग्य, शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षणासाठी संपर्क करा.

संबंधित बातम्या