असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २० मे

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २० मे
  • Positive News
  • मे 20 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २० मे

मंगळवार, २० मे २०२५. वैशाख कृष्ण अष्टमी. ग्रीष्म ऋतू. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 

"आज चांगला दिवस आहे" 

नक्षत्र - धनिष्ठा/शततारका. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर/ (सकाळी ७.३६ नंतर) कुंभ. (एइन्द्र योग् शांती)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र त्रिकोण गुरू आणि चंद्र केंद्र रवी आणि हर्षल आहे. चंद्र अनुकूल आहे. मोठी आर्थिक उलाढाल होईल. नेहमीची कामे चालू ठेवा. कौटुंबिक कलह होऊ शकतो.  
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नोकरीच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. काळजीपूर्वक काम करा. वृथा अहंकार नको. हाडांची काळजी घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नवम स्थानी चंद्र आहे. गुरू तुमच्या राशीत आहेत. अनुकूल ग्रहमान आहे. प्रगती होईल. मात्र प्रतिकूल रवी, हर्षल अडचणी निर्माण करतील.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र ग्रहमान आहे. रवी, हर्षल अनुकूल आहेत. अचानक लाभ होतील. मान सन्मान मिळतील. घरातील ज्येष्ठची काळजी घ्या.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पत्नीची बहुमोल साथ लाभेल. कामाच्या ठिकाणी विनाकारण कटकटी होऊ शकतात. अधिकारी त्रास देतील. संयम बाळगा.   
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसाय वाढेल. आर्थिक लाभ होतील. मात्र नियोजन काटेकोर करा. प्रवासात काळजी घ्या. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. प्रतिष्ठा पणास लागेल. प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला. विनाकारण भलते धाडस नको.
  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शत्रू शिरजोर होतील. कोर्ट कामात मनासारखे निकाल लागणार नाहीत. घरगुती कामे करावी लागतील. 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उधारी वसूल होईल. स्थावर संपत्ती वाढेल. भावंडे स्थ देतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत रात्रीपासून चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. संततीची काळजी घ्या. शेअर्स मधून नुकसान संभवते. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सकाळी ८.०० नंतर अनुकूलता वाढेल. मात्र फारसा आशादायक दिवस नाही. संतती कडून चांगली बातमी समजेल. गुंतवणुकीतून लाभ होतील. घरगुती कलह होऊ शकतो. व्यक्त होताना काळजी घ्या. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सकाळी अनुकूल ग्रहमान आहे. कामे पूर्ण करा. वाहन सांभाळून चालवा. लेखकांनी काळजी घ्यावी. संध्याकाळ चिंता वाढवणारी असू शकते.

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या