असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५
  • Positive News
  • ऑक्टोबर 31 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५
 कार्तिक शुक्ल नवमी/दशमी. विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
 चंद्र – आधी मकर आणि नंतर कुंभ राशीत, धनिष्ठा आणि शततारका नक्षत्रात
 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – सकाळी १०.३० ते १२.००

आज उत्तम दिवस आहे. (वृद्धी योग आहे)

 मेष: आज तुमचं वाक्‌चातुर्य लोकांना प्रभावित करेल. कामात नवीन कल्पना मांडाल. प्रवास योग उत्तम. आर्थिक लाभाची संधी मिळेल.

 वृषभ: कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक स्थैर्य वाढेल. जुनी देणी मिळण्याची शक्यता. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

 मिथुन: आजच्या ग्रहस्थितीत सामाजिक संपर्क वाढतील. नवीन करार किंवा करिअरविषयक संधी येतील. मित्रांकडून मदत लाभेल.

 कर्क: कामातील जबाबदारी वाढेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. मानसिक थकवा जाणवेल, पण कार्यसिद्धी मिळेल.

 सिंह: तुमचा आत्मविश्वास उच्च राहील. विदेशसंबंधी कामात यश. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ. दांपत्य जीवनात आनंद वाढेल.

 कन्या: खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. भावनिक निर्णय टाळा. दुपारनंतर काही शुभ बातमी मिळू शकते.

 तूळ: जोडीदाराकडून उत्तम सहकार्य. भागीदारीत यश. नवी ओळख लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

 वृश्चिक: आज कामाचा व्याप वाढेल. परिश्रमाचे फळ मिळेल. सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या.

 धनु: सर्जनशीलता वाढेल. प्रेमसंबंधात आनंददायक घडामोडी. मुलांशी संबंधित कार्यात प्रगती. गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ.

 मकर: घरगुती विषयांवर लक्ष द्या. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. स्थावर मालमत्तेविषयी विचार पुढे सरकतील.

 कुंभ: चंद्र तुमच्या राशीत असल्याने उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामांची सुरुवात यशस्वी होईल. लहान प्रवास फलदायी.

 मीन: आर्थिक दृष्ट्या सावध राहा. भावनिक ओढाताण संभवते. खर्च वाढेल. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा.

 आजचा शुभ रंग: जांभळा
 आजचा मंत्र: “ॐ नमो भगवते वासुदेवाय”
 विशेष टीप: चंद्र शततारका नक्षत्रात असल्याने आरोग्यविषयक काळजी घ्यावी आणि मानसिक स्थिरता राखावी.

-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
 

संबंधित बातम्या