वैशाख कृष्ण त्रयोदशी / चतुर्दशी.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज क्षय तिथी आहे.
चंद्रनक्षत्र - अश्विनी / (रात्री ८.१५ नंतर) भरणी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष.
चंद्र केंद्र प्लूटो योग.
१५ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. प्रतिशत आणि मान - सन्मान यास तुम्ही अधिक महत्व देतात. तुम्ही जन्मताच कलासक्त आणि स्वतः एक कलाकार आहेत. भिन्न लिंगी व्यक्तीकडून तुम्हाला लाभ होतात. इतरांची परीक्षा तुम्ही चटकन करू शकतात. तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि व्यापारी साठी आवश्यक तो धूर्तपणा तुमच्या मध्ये आहे. तुमचे गुण दाखवण्याची संधी तुम्हाला क्वचित मिळते. चाणाक्ष स्वभावअसून निरीक्षण शक्ती चांगली असते. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून त्याचा व्यवहारात चांगला उपयोग होतो. लॉटरी, कोडी सोडवणे, शेअर्स यांची आवड असते. घर, संसार, मित्र यात तुम्ही गुरफटून जातात. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे आणि तुम्ही लोक प्रिय आहात. तुमच्या बोलण्यामध्ये मोहक पण आहे आणि तुमचा मित्रमंडळींचा सर्कल मोठे असते. तुमच्या रूढी आणि परंपरा संबंधीत कल्पना इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या असल्या तरी तुम्हाला त्या आवडतात आणि इतरांना त्या समजून घेणे जरा कठीण जाते. तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. तुमच्या उद्दिष्टापासून तुम्ही बाजूला होत नाही. तुम्ही बोलण्यात हुशार आहात. तुम्हाला कीर्ती आणि मानसन्मान मिळतो. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, समारंभांमध्ये, सामाजिक कार्यात भाग घेणे तुम्हाला आवडतं. तुम्ही इतरांना आनंदाने मदत करतात. धार्मिक आणि तत्वज्ञान विषयाची तुम्हाला आवड असते. तुमचे आयुष्य कमी कष्टाचे जाते. तुम्ही उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्य, दागिने, वाहने, कपडे वापरतात. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही संशयी असतात.
व्यवसाय:- बेकरी, हॉटेल, संगीतकार, दागिने विक्री, आर्किटेक्ट, गृहसजावट, बँकिंग, वैद्यकीय, प्रयोगशाळा उपकरणे, केमिस्ट, पॅथॉलॉजी.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.
शुभ रत्न:- पाचू ,मोती ,हिरा.
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. महत्त्वाचे निर्णय धाडसाने घ्याल. चंद्र केंद्र प्लूटो योगामुळे मनात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्ययस्थानी चंद्र असल्याने खर्च वाढू शकतो. काही जुने विषय मनाला अस्वस्थ करतील. तरीही ग्रहमान अनुकूल असल्याने अडचणींवर मात कराल. गुप्त शत्रूपासून सावध राहा. धार्मिक कार्यात मन रमणार आहे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) लाभस्थानी चंद्र आल्याने मित्रांकडून सहकार्य मिळेल. तुमची वक्तृत्वशैली आज इतरांना प्रभावित करेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. मात्र अति आत्मविश्वास टाळा.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) कर्मस्थानी चंद्र असल्याने नोकरी व व्यवसायात व्यस्तता वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना थकवा जाणवेल. आर्थिक स्थिती सुधारेल. मनातील चिंता मात्र पूर्णपणे दूर होणार नाही.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) भाग्यस्थानी चंद्र असल्याने आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रिय व्यक्तीकडून आनंददायक बातमी मिळू शकते.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) अष्टमस्थानी चंद्र असल्याने मन काहीसे अस्थिर राहील. अचानक खर्च उद्भवू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. मात्र प्लूटो योगामुळे संशोधन, गूढ विषय किंवा तांत्रिक कामात यश मिळेल. वादविवाद टाळा.
तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सप्तमस्थानी चंद्र असल्याने जोडीदारासोबत वेळ आनंदात जाईल. भागीदारीच्या कामात लाभ संभवतो. मनातील संभ्रम दूर होईल. वैवाहिक चर्चांना गती मिळेल. मात्र हट्टीपणा टाळणे हिताचे ठरेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) षष्ठस्थानी चंद्र असल्याने कामाचा ताण वाढेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्याल. महिलांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ संभवतो, मात्र खर्चही वाढतील.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पंचमस्थानी चंद्र असल्याने कला, साहित्य आणि छंद यात मन रमणार आहे. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) चतुर्थस्थानी चंद्र असल्याने घरगुती कामांकडे लक्ष द्यावे लागेल. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत लाभदायक घटना घडतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक समाधान लाभेल. खर्चाचे नियोजन आवश्यक आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) तृतीयस्थानी चंद्र असल्याने धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. छोट्या प्रवासाचे योग आहेत. लेखन, पत्रकारिता, कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. मात्र बोलण्यात संयम आवश्यक आहे.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) द्वितीयस्थानी चंद्र असल्याने आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबीयांसोबत आनंददायक वेळ जाईल. वाणीचा प्रभाव वाढेल. नवीन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. मात्र अति भावनिक होऊन निर्णय घेऊ नका.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)