असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ९ सप्टेंबर

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ९ सप्टेंबर
  • Positive News
  • सप्टेंबर 9 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ९ सप्टेंबर
मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५. भाद्रपद कृष्ण द्वितीया/तृतीया. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ -  दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०.

आज उत्तम दिवस आहे. 

चंद्रनक्षत्र - उत्तरा भाद्रपदा/(संध्याकाळी ६.०७ नंतर) रेवती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन. (गंड योगाची शांती करून घेणे)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा रवीशी अशुभ योग आहे. संमिश्र ग्रहमान आहे व्यय स्थानी चंद्र आहे. आज काही रखडलेली कामे पूर्ण होतील. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल. आज तुमच्या हातून कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. अहंकार टाळावा.  
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) चंद्र अनुकूल आहे. व्यवसाय वाढेल. मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. नोकरीच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. मातृभूमीची सेवा करा. आज तुमचे कामाचे स्थान बदलेल. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दशम स्थानी चंद्र आहे. कामानिमित्त प्रवास घडतील. बौद्धिक क्षेत्र गाजवाल. आध्यत्मिक व्यक्तीची भेट होईल. विनाकारण मोठी जोखीम घेऊ नये. राजकारणात पडू नये.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नवम स्थानी चंद्र आहे.  मनासारखी कामे पार पडतील. स्वप्ने साकार होतील. दागिने किंवा रत्ने खरेदी होऊ शकते. वारसा संपत्तीत काहीसे अडचणी उत्पन्न होऊ शकतात. पित्याची काळजी घ्या. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अष्टम स्थानी चंद्र आहे. तुमच्या राशीतील राशीस्वामी सूर्याची अनुकूलता आज कमी जाणवेल. काही अडचणी दूर होतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. आत्मविश्वास कमी होईल. विश्वासघात होण्याचे संकेत आहेत. अपेक्षित वागणूक मिळणार नाही. 
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सप्तम स्थानी चंद्र आहे. व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी होईल. एखादी आपत्ती येऊ शकते किंवा सरकारी दंड भरावा लागू शकतो. काळजी घ्या. अपेक्षित यश मिळण्यास वेळ लागणार आहे. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात आहे. उद्योजकांना चांगला दिवस आहे अपेक्षित यश मिळेल. मन प्रसन्न राहील. तीर्थयात्रा घडेल. अनुकूल सुर्यामुळे काही अडकलेली कामे पुढे सरकतील मात्र फार मोठे यश मिळणार नाही.  
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) पंचम स्थानी चंद्र आहे. नोकरीत कामाचा ताण वाढणार आहे मात्र तुम्ही त्यासाठी सक्षम आहात. आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील. दशम रवी असल्याने आज वरिष्ठांची मर्जी संपादन करणे अवघड जाईल. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चतुर्थ चंद्र आहे. मन आनंदी राहील. कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून सहकार्य लाभेल. नवम रवी तुम्हाला गूढ गोष्टीचे आकर्षण निर्माण करेन. धर्म कार्य कराल. पित्याची काळजी घ्या.   
  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. तृतीय चंद्र आहे. भ्रमंती घडेल. परदेश गमनाचे योग आहेत. मात्र अष्टम रवीची नाराजी आहे. त्याचा फटका बसू शकतो. अनैतिक कामे करण्याकडे कल असू शकतो मात्र वेळीच सावध व्हा.   

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) द्वितीय स्थानी चंद्र तर सप्तम स्थानी रवी आहे. काळजीचे कारण नाही. तुमचा एखादा नातेवाईक प्रवासातून परत येईन. व्यापार वाढेल मात्र उधारी देखील वाढणार आहे. मौल्यवान वस्तू सांभाळा.  
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीत चंद्र आहे. मन आनंदी राहील. मात्र महत्वाची कामे आज टाळावी लागतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. विनाकारण कोणत्याही राजकारणात पडू नका.

-सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
 

संबंधित बातम्या