असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ८ सप्टेंबर

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ८ सप्टेंबर
  • Positive News
  • सप्टेंबर 8 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ८ सप्टेंबर
सोमवार, ८ सप्टेंबर २०२५. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा. वर्षा ऋतू. विश्वावसु नाम संवत्सर शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

चंद्र नक्षत्र - पूर्वा भाद्रपदा/ (रात्री ८.०३ नंतर उत्तरा) भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ/ (दुपारी २.२९ नंतर) मीन. (धृती आणि शूल योगाची शांती)

"आज करी दिन आहे.  
८ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर शनि आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे जीवनात बऱ्याच वेळेला कोणतीही गोष्ट वेळच्यावेळी होत नाही. शिस्त, गांभीर्य, दृढपणा आणि कर्तव्याची जाण तुमच्यामध्ये आहे. तुम्ही अत्यंत विचारी आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुमचे विचार समतोल असून कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू बघण्याकडे तुमचा कल असतो. तुमच्याबद्दल इतरांचे बरेच गैरसमज होतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून सतत कामात मग्न राहणे तुम्हाला आवडते. तुम्ही धोरणी, हुशार, कार्यशील आणि दुर्बल लोकांबद्दल आदर दाखवणारे आहात. तुम्हाला निसर्ग सौंदर्य, फुले आणि संगीत यांची आवड असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात आणि इतरांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमते. तुम्ही न्यायप्रिय आहात मात्र तुम्हाला अनेकदा नैराश्य जाणवते आणि जीवनामध्ये एकाकी वाटते. तुमच्यामध्ये अधिकार, वचक आणि जोम या गोष्टी भरपूर आहेत. व्यवहारातील सर्व गोष्टी सुलभ पणे हाताळण्यात तुम्हाला यश येते. आर्थिक बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक नियोजन करतात, इतरांना तुमची मदत होते कारण इतरांचे दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. आपण जीवनात अधिकार गाजवावे असे तुम्हाला कायम वाटते. तुम्ही दिर्घउद्योगी आहात. लोकांची नावे आणि चेहरे लक्षात ठेवण्यात तुम्ही तरबेज असतात.

व्यवसाय:-  भौतिक, रसायन, वैद्यकीय शास्त्र, गणित, पतपेढी व्यवस्थापक, पॅथॉलॉजी, जिथे तर्कनिष्ठता आणि बुद्धी लागते असे क्षेत्र तसेच वकिली.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.

शुभ रंग:- निळा, जांभळा, हिरवा, राखाडी.

शुभ रत्न:- इंद्रनील, पाचू लसण्या, अमेथीस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
  
मेष:- सकाळी चंद्र अनुकूल आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी होईल. घरातील दुरुस्ती करावी लागेल. खर्च वाढतील. प्रवासात त्रास संभवतो. उत्तरार्ध संमिश्र आहे. अध्यात्मिक कार्य करण्यास उत्तम कालावधी आहे.
     
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. वक्तृत्व गाजेल. कलाकारांना लाभ होतील. व्यापारात लाभ होईल. वाहन खरेदीचाविचार करण्यासाठी चांगला दिवस आहे.  
 
मिथुन:- नोकरी/ व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. सहकारी खुश राहतील. एखादा मोठा आणि महत्वाचा प्रश्न आज सुटू शकतो. कर्ज प्राप्ती होईल. संध्याकाळ अधिक अनुकूल आहे.

कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. सकाळी चंद्र अष्टम स्थानी आहे. धनलाभ होईल.  मन शांत राहील. प्रवास घडतील. ध्यानधारणा करा. संध्याकाळी कामाचा वेग वाढेल. धर्मकार्य करण्यास अनुकूल दिवस आहे.
 
सिंह:-  सकाळचं सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा. आज काही फारसे वेगळे घडणार नाही. दुपार नंतर  कामाचे नियोजन बदलेल. मानसिक त्रास जाणवेल. मात्र काही सुखद घटना घडतील.
  
कन्या:- व्यापार वाढीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आज कामे पूर्ण करा. मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील. भ्रमंती घडेल. नेमके नियोजन कराल. तुमच्या समोर चंद्र शनी युती आहे. तुमचा मत्सर करणारे लोक तुमच्या कामात अडथळे आणू शकतात. 
 
तुळ:- तुमच्या पंचम आणि षष्ठ स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. हरवलेली वस्तू सापडेल. अडचणी दूर होतील. धनलाभ होईल. विश्वासु मित्राचा सल्ला मानणे हिताचे आहे.   
 
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. मानसिक सौख्य लाभेल. पुढील नियोजन कराल. आर्थिक बाजू मजबूत होईल. पंचम स्थानी चंद्र शनी युती आहे. अचानक लाभाचे प्रलोभन दिसेल. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.  

धनु:- अनुकूल दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. मन प्रसन्न राहील. पाळीव प्राणी आनंद देतील. व्यवसायात एखादी अभूतपूर्व घटना घडू शकते. आरोग्य सांभाळा.
 
मकर:- लाभ होईल. आर्थिक आवक वाढल्याने नियोजन होऊ शकेल. लेखकांना उत्तम यश मिळेल. आज शौर्य दाखवण्याचा दिवस नाही याची नोंद घ्या.    
 
कुंभ:- अनुकूल दिवस आहे. सकाळच्या सत्रात फारसे काही घडणार नाही. पैसे येतील तसेच जातील. खर्च वाढू शकतात. वक्तृत्व चमकेल. उत्तराध चांगला आहे. शब्दप्रविण्य अनुभवाल.
 
मीन:- संमिश्र दिवस आहे. सकाळी फारशी अनुकूलता नाही. बौद्धिक क्षेत्रात नाव मिळेल. दुपार नंतर तुमच्या राशीत चंद्र आणि शनीची युती आहे. सन्मान होतील. कौतुक होईल. सल्ला मोलाचा ठरेल. मात्र कोणताही गैरकृत्य हातून होणार नाही याची काळजी घ्या.  
 

संबंधित बातम्या