राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज वृद्धी तिथी आहे"
नक्षत्र -चित्रा/ (आज दुपारी ४.१७ नंतर) स्वाती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तूळ. (एइंद्र योग शांती)
२४ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्ही विलक्षण कर्तृत्ववान आणि कायदाप्रेमी आहात. तुम्हाला बुद्धिमान वर्तुळात वावरणे आवडते. तुमचे सामाजिक वजन चांगले असते. त्यामुळे तुमच्याकडे उच्च वर्तुळातील लोकांचे येणे - जाणे असते. तुम्हाला भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतात. तुमचा भाग्योदय विवाहानंतर होतो आणि तुमचा विवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो. वयाच्या ३३ व्या वर्षीपासून प्रगती होते. तुमचे वक्तृत्व चांगले असते. तुम्ही झटपट निर्णय घेतात. तुमचे विचार स्वतंत्र असतात. आपल्या आयुष्यात काहीतरी सनसनाटी घडावे असे तुमहाल सतत वाटत असते. मोठेपणा, प्रतिष्ठा मान सन्मान यास तुम्ही अधिक महत्व देतात. तुम्ही सतत कामात मग्न असतात. गूढ विषयांचे तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही संशोधक वृत्तीचे, आशावादी, दिमाखदार आहात. तुम्हाला जुगार, कोडी, शेअर्स यांचा छंद असतो. तुम्ही एक बुद्धिमान कलाकार असतात. तुमच्या कलेचा तुम्ही व्यवसायिक दृष्ट्या पूर्ण वापर करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असते आणि त्याचा उपयोग व्यवसायात होतो. तुमचा सहवास इतरांना सुखावतो. नीती आणि अनिती याबद्दलच्या तुमच्या कल्पना जरा वेगळ्या असतात त्यामुळे इतरांना त्या समजत नाहीत. तुम्ही जुन्या परंपरा पाळत नाहीत. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घेतात. तुमचे वक्तृत्व चांगले असते. जीवनात तुम्हाला अधिकार आणि मानसन्मान मिळतो. तुमचे आयुष्य आरामदायक आणि भौतिक सुखाने पूर्ण असते. उत्तम कपडे, सुगंधीत द्रव्य आणि महागड्या गाड्यांची तुम्हाला आवड असते. प्रेमात तुम्ही संशयी असतात.
व्यवसाय:- संगीतकार, दागिने विक्री, आर्किटेक्ट, बेकरी, हॉटेल मॅनेजमेंट, बँकिंग, मेडिकल स्टोअर्स, शेअर ब्रोकर, कमिशन एजंट, इस्टेट ब्रोकर.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा आणि गुलाबी.
शुभ रत्न:- पाच मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सप्तम स्थानी चंद्र आहे. आज नवीन ओळखी होण्याचा दिवस आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल मात्र ती भेट एखाद्या नातेवाईकांस फारशी आवडणार नाही याची दखल घ्या. वाहन सौख्य मिळेल. खुशखबर येईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उद्योग/व्यवसायात भरभराट अनुभवास येईल. विशेषतः महिलांशी संबंधित वस्तूंची विक्री वाढेल. सुवासीके, दागिने व्यवसायात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) जमीन आणि तयार घरे यांच्या विक्रीत वाढ होईल. बहिणीकडून लाभ होतील. दबदबा वाढेल. अधिकारात वाढ होणार आहे. मात्र त्याचा गैरवापर करू नका.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) गायक/ कलाकार/ अभिनेते यांना उत्तम दिवस आहे. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. नवीन खरेदी होईल. शेजाऱ्यांशी काहीसे वाद होऊ शकतात मात्र त्यात तुमची सरशी होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आज प्रणयरम्य दिवस आहे. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल. उच्च प्रतीचे कपडे आणि दागिने यांचा महिलांना लाभ होईल. नात्यातून काही भेटवस्तू मिळतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमचे व्यक्तिमत्व आज तेजाने तळपणार आहे. तसे तुम्ही मृदू बोलतात पण आज कठोर बोलणे होईल. त्यावर अर्थातच नियंत्रण ठेवले पाहिजे. चैनीवर खर्च कराल. तीर्थाटन घडेल. छोट्या सहलीचे योग आहेत.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमच्या राशीत चंद्र आणि मंगळाची युती आहे. आज तुम्ही इतरांना उग्र भासणार आहात. अनुकूल शुक्रामुळे तुम्हाला आज नृत्य, संगीत यांचा आस्वाद घेण्याची इच्छा निर्माण होईल मात्र काही कारणाने त्यात पुरेसा सहभाग नोंदवता येणार नाही. त्यामुळे चिडचिड होऊ शकते.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) स्वतःच्या व्यक्तिमत्वावर तुम्ही खुश असतात. आज त्यासाठी जास्त खर्च कराल. तुमची स्त्री राशी असली तरी आज वृश्चिक पुरुषांना विशेष उत्साह जाणवेल. कामाच्या ठिकाणी महिलांकडून उत्तम सहकार्य मिळेल. मात्र खर्चात वाढ होणार आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज आनंदाचा दिवस आहे. ग्रहमान अनुकूल आहे. तुम्हाला योग्य साथ देणारी जोडीदार आज भेटू शकते. नृत्य, नाट्य आणि संगीत यात तुम्ही रममाण व्हाल. अडचणी दूर होऊ लागतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक आवक वाढवणारा दिवस आहे. विशेषतः महिलांकडून लाभ होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. कामाचा ताण वाढणार आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज तुम्हाला काहीसा दिलासा देणारे ग्रहमान आहे. नैराश्य दूर होऊ लागेल. पत्नी सोबत एखादी सहल घडेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. कुलदेवता प्रसन्न होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आज जुने देणी द्यावी लागतील. काही जुने हिशोब पूर्ण करावे लागतील. पूर्वी केलेल्या चुका सुधाराव्या लागतील. मीन पुरुषांनी महिलांशी वागताना काळजी घ्या, गैरसमज होऊ शकतो.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521