असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २४ मे
आजचे राशिभविष्य आणि आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्टये :-
शनिवार, २४ मे २०२५. वैशाख कृष्ण द्वादशी/त्रयोदशी. शके १९४७, संवत २०८१. ग्रीष्म ऋतू, विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे" शनिप्रदोष
नक्षत्र: रेवती/(दुपारी १.४८ नंतर) अश्विनी. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मीन/ (दुपारी १.४८ नंतर) मेष.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र लाभ गुरू आणि बुध युती हर्षल योग आहे. दिवसाची सुरुवात फारशी आशादायक नसली तरी दुपारनंतर अनुकूलता वाढेल. वक्तृत्व गाजेल. नात्यातून लाभ होतील.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. कामाला वेग येईल. दुपार नंतर आळस येईल. खर्च वाढेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. उत्साह वाढेल. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील. अडचणी दूर होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. शुभ कर्मे घडतील. नैतिक अधिष्ठान लाभेल. प्रवास घडतील. वादविवाद टाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सुरुवात फारशी अनुकूल नाही. ज्येष्ठांची काळजी लागून राहील. आर्थिक लाभ वाढतील. प्रवास होतील. उच्च शिक्षणात यश.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. सुरुवात उत्तम होणार आहे. वेगवान प्रगती होईल. दुपार नंतर चंद्र अनुकूल नाही.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यावसायिक लाभ होतील. काही चांगल्या घटना घडतील. वेगवान घडामोडी घडतील. अष्टमात बुध हर्षल युती आहे. अप्रिय बातमी येऊ शकते.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दिवस अनुकूल आहे. गुंतणुकीतून लाभ मिळतील. जमीन व्यवहारातून फायदा होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. रखडलेली कामे आज पूर्ण होतील. संतती बाबत चांगली बातमी समजेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तृतीय आणि चतुर्थ चंद्र संध्याकाळी घरगुती कामात अडकवून ठेवेल. कौटुंबिक कामासाठी भ्रमंती घडेल. व्यापारात चांगले यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. कामाचा ताण वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. संध्याकाळ आनंदाची.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्साही दिवस आहे. वाहन सुख लाभेल. इतरांचे सहकार्य मिळेल. संधी चालून येतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
२४ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या मोठ्या प्रमाणात ओळखी असतात. उच्च लोकांकडे येणे जाणेअसते. श्रीमंत व्यक्तीशी विवाह होतो आणि विवाहानंतर भाग्योदय होतो. शेअर्स, लॉटरी यात यश मिळते. आर्थिक बाबतीत तुम्ही सुखी आणि संपन्न असतात. खाजगी जीवन आणि सामाजिक जीवन याततुम्ही अंतर राखू शकतात. तुम्ही कायदाप्रेमी आहात. संभाषण चातुर्य असते. शब्दभांडार मोठे असते. तुम्ही उतावीळ असतात. उत्तम लेखक आणि प्राध्यापक असतात. प्रतिष्ठा आणि मान - सन्मान यास तुम्ही अधिक महत्व देतात. तुम्ही जन्मताच कलासक्त आणि स्वतः एक कलाकार आहेत. भिन्न लिंगी व्यक्तीकडून तुम्हाला लाभ होतात. इतरांची परीक्षा तुम्ही चटकन करू शकतात. तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि व्यापारी साठी आवश्यक तो धूर्तपणा तुमच्या मध्ये आहे. तुमचे गुण दाखवण्याची संधी तुम्हाला क्वचित मिळते. चाणाक्ष स्वभावअसून निरीक्षण शक्ती चांगली असते. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून त्याचा व्यवहारात चांगला उपयोग होतो. घर, संसार, मित्र यात तुम्ही गुरफटून जातात. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे आणि तुम्ही लोक प्रिय आहात. तुमच्या बोलण्यामध्ये मोहक पण आहे आणि तुमचा मित्रमंडळींचा सर्कल मोठे असते. तुमच्या रूढी आणि परंपरा संबंधीत कल्पना इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या असल्या तरी तुम्हाला त्या आवडतात आणि इतरांना त्या समजून घेणे जरा कठीण जाते. तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. तुमच्या उद्दिष्टापासून तुम्ही बाजूला होत नाही. तुम्ही बोलण्यात हुशार आहात. तुम्हाला कीर्ती आणि मानसन्मान मिळतो. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, समारंभांमध्ये, सामाजिक कार्यात भाग घेणे तुम्हाला आवडतं. तुम्ही इतरांना आनंदाने मदत करतात. धार्मिक आणि तत्वज्ञान विषयाची तुम्हाला आवड असते. तुमचे आयुष्य कमी कष्टाचे जाते. तुम्ही उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्य, दागिने, वाहने, कपडे वापरतात. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही संशयी असतात.
व्यवसाय:- बेकरी, हॉटेल, संगीतकार, दागिने विक्री, आर्किटेक्ट, गृहसजावट, बँकिंग, वैद्यकीय, प्रयोगशाळा उपकरणे, केमिस्ट, पॅथॉलॉजी.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.
शुभ रत्न:- पाचू ,मोती ,हिरा.
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521