.असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १८ जून
आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांची वैशिष्ट्ये:-
बुधवार, १८ जून २०२५. ज्येष्ठ कृष्ण सप्तमी/अष्टमी. विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१, वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज चांगला दिवस आहे" काळाष्टमी
नक्षत्र - पूर्वा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ/(संध्याकाळी ६.३५ नंतर) मीन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा हर्षलशी लाभ योग आहे. माफक यश मिळेल. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल. इतिहासात रममाण व्हाल. अति धाडस नको. सरकारी कायदे पाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) चंद्र अनुकूल आहे. अचानक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. घराण्याची प्रतिष्ठा राखणे तुमच्या हातात आहे. कटू प्रसंग टाळा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्साह वाढेल. खर्च वाढतील. कामाच्या ठिकाणी कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र कालावधी आहे. जोखीम घेऊ नका. दुपार नंतर ग्रहमान अनुकूल होईल. अचानक धनलाभ होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. नोकरी/व्यवसायात उत्तम लाभ होतील. प्रतिष्ठेसाठी खर्च होईल. विनाकारण वाद टाळावेत.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अर्थकारण मजबूत होत आहे. व्यवसायिक प्रगती साध्य होईल. नवीन खरेदी होईल. संयम ठेवावा लागेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूलता लाभेल. आरोग्यचे प्रश्न सुटतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करावी लागेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शेअर्स व्यवहारात अधिक काळजी घ्यावी लागेल. पैशांची हाताळणी काळजीपूर्वक करा. प्रतिकूल सूर्य काही प्रश्न निर्माण करेन. उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज तुम्हाला कष्टाचा लाभ मिळेल. जमीन/ शेती यातून फायदा होईल. अडचणीतून मार्ग निघू लागतील. भागीदारी व्यवसाय टाळा. आरोग्य सांभाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आध्यत्मिक आणि आर्थिक लाभ होतील. गूढ उलगडतील. जेष्ठ व्यक्तीची सेवा कराल. शासकीय कामे रेंगाळतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यावहारिक विचार करावा लागेल. दीर्घकालीन नियोजन कराल. प्रतिकूल सूर्य आरोग्याचे प्रश्न निर्माण करेन. संततीशी संवाद साधा. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीत संध्याकाळी चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. अचानक आर्थिक लाभ होतील. कलाकारांना यश मिळेल. शत्रू त्रास जाणवेल.
१८ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही सभ्य आणि मोठ्या मनाचे आहात. सुदृढ आहात. विकारांवर ताबा ठेवला पाहिजे. वक्तृत्व, हरहुन्नरीपणा ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. मोठपणा आणि मान सन्मान यांस तुम्ही अधिक महत्व देतात. इतरांना शिकवणे, स्वतः अभ्यास करणे तुम्हाला आवडते. वडिलोपार्जित संपत्ती मिळते. वैवाहिक जीवनातील समस्यांचा दबाव घेऊ नका. कारण तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार आणि लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला पुर्ण विश्वास आहे. तुम्हाला आयुष्यात मोठा अधिकार आणि मानसन्मान मिळतात. तुम्हाला शक्तिशाली खेळांची आणि व्यायामाची आवड आहे. इतरांवर तुम्ही दया करतात मात्र त्यातून तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळतो. आजारी लोकांना तुम्ही स्वतःचे क्षमतेने बरे करू शकतात. तुम्ही शीघ्रकोपी आहात मात्र स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकतात. बौद्धिक क्षेत्रात काम करणे तुम्हाला आवडते. तुमचे विचार ठाम आहेत. तुम्हाला तुमची मुले आणि बहिणी जास्त प्रिय असतात. तुम्ही कायदा प्रेमी आहात. जबाबदारीच्या जागांवर तुम्ही काम करू शकतात. तुमची मनाची शक्ती अफाट असून तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्हाला प्रवासातून अनेक अनुभव येतात आणि त्यामुळे तुमचे जीवन परिपक्व होते. तुम्ही अभ्यासू वृत्तीचे आहात. इतरांच्या पेक्षा तुमचे विचार पुढे असतात. तुम्ही तुमच्या मतांशी ठाम असतात. विनाकारण इतरांची खोडी काढणे तुम्ही टाळले पाहिजे. आयुष्यात अहंकार आणि पोकळ दिमाख याला काही अर्थ नाही. तुम्ही बोलण्यामध्ये आणि वक्तृत्वात प्रवीण आहात. स्वतःची चूक तुम्ही कधीही मान्य करत नाहीत. इतरांवर टीका करणे टाळल्यास तुम्ही अधिक प्रगती करू शकाल.
व्यवसाय:- हॉटेल व्यवस्थापन, संगीतकार, दाग-दागिने विक्री, बेकरी, गृहसजावट, पोलीस, मिल्ट्री, डॉक्टर, केमिस्ट, लोखंड, बांधकाम क्षेत्र, इंजिनिअर.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- तांबडा, पांढरा, पिवळा.
शुभ रत्न:- पाचू, पुष्कराज, मोती माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.