असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  ८ ऑगस्ट

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  ८ ऑगस्ट
  • Positive News
  • ऑगस्ट 8 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  ८ ऑगस्ट

आजचे राशिभविष्य आणि आज जन्मलेल्या आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या स्वभावाची वैशिष्टये:-

शुक्रवार, ८ ऑगस्ट २०२५, श्रावण पौर्णिमा. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ -  सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे. नारळी पौर्णिमा, कुलधर्म, वरदलक्ष्मी व्रत 

चंद्रनक्षत्र - उत्तरा आषाढा/श्रवण.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर. विष्टी करण शांती. 

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शनी, हर्षल, मंगळ, नेपच्यूनशी शुभयोग आहे. अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील.  व्यापारात भरपूर नफा होईल. इच्छापूर्ती होईल. मनासारखी कामे होतील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) 
अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. नोकरी/व्यवसायात प्रगती होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील. धर्माचे काम कराल. उच्च शिक्षणात यश मिळेल.
  
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. आज काही रोचक अनुभव येतील. नात्यातून लाभ होतील. राजकारणात तुमचे वजन वाढेल. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वैज्ञानिक शिक्षणात वरिष्ठ स्थानी जाल. मित्र मंडळी यांचा सहवास लाभेल. आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक लाभ होतील. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यवसायात वाढ होईल. नोकरीत चांगले अनुभव येतील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. मात्र त्याचा परतावा मिळण्यास वेळ लागेल. संयम ठेवावा लागेल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्या राशीतील मंगळाशी चंद्राचा शुभ योग आहे. अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळेल. आज मनासारखी कामे होतील. बुद्धी कौशल्यचा वापर कराल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सामाजिक कार्यात आज तुम्ही पुढे असणार आहात. आर्थिक उलाढाल वाढेल. प्रगतीचा वेग चांगला राहील. स्पर्धेत तुम्हाला विजय प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी काहीसा मनाचा गोंधळ होऊ शकतो.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) त्रितीय स्थानी चंद्रआहे. अनुकूल ग्रहमान आहे.  व्यवसाय वाढेल. आर्थिक आवक चांगली असणार आहे. बुद्धीचातुर्य दाखवाल. अनुकूल मंगळ मार्ग दाखवेन. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) द्वितीय चंद्र आहे. सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जमिनीतून उत्तम लाभ होतील. स्थावर संपत्ती वाढेल. लक्ष्मीची कृपा राहील. अचानक धनलाभ संभवतो.
  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे.  कामानिमित्त केलेल्या प्रवासातून उत्तम लाभ होतील. सप्तम स्थानी बुध आहे. काही चुकीचे निर्णय होऊ शकतात. आज नवीन ओळखीतून फायदा होईल.       

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र आहे. ग्रहमान संमिश्र आहे. प्रगती साधणारा दिवस आहे. मन आनंदी राहील.  सांपत्तिक स्थिती सुधारेल. मात्र खर्च देखील वाढणार आहे. आरोग्यासाठी खर्च करावा लागेल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभ स्थानी चंद्र आहे.  नोकरी/व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. नवीन संधी प्राप्त होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. आवडते छंद जोपासले जातील. ही पौर्णिमा आनंदाची जाईल. 

-ज्योतिशी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

८ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर रवी आणि शनी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड असते. उथळ संगीतापेक्षा गंभीर संगीत तुम्हाला आवडते. तुम्ही कडक शिस्तीचे भोक्ते आहात आणि कर्तबगार आहात. तुम्हाला शांतता आणि एकांत आवडतो. निसर्ग, फुले, रम्य देखावा, याची तुम्हाला ओढ असते. तुम्ही कधी कधी अति निराशावादी होतात. समाजापासून दूर राहणे पसंत करतात. भविष्याबद्दल तुम्हाला नेहमीच काळजी वाटत असते. तुम्ही अत्यंत धोरणी, हुशार आणि मुत्सद्दी आहात. तसेच महत्त्वाकांक्षी आणि दिर्घउद्योगी देखील आहात मात्र अति महत्त्वाकांक्षा असता कामा नये. तुम्हाला जी गोष्ट हवी असते त्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेतात. तुमच्यामध्ये चिवटपणा आहे मात्र त्याचबरोबर संशय वृत्ती देखील असते. तुम्ही अधिकार गाजवणारे आहात. अनेकदा तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला जातो. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल आपुलकी असते. तुम्ही न्याय प्रेमी आणि कायदा प्रेमी आहात मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये सतत अडचणी आणि विलंब यांचा अनुभव येतो. आपण इतरांवर अधिकार गाजवावा किंवा आपल्याला मानसन्मान मिळावेत असे तुम्हाला मनातून नेहमी वाटत असते. इतरांकडून काम करून घेण्यात तुम्हाला अडचण येतात. जीवनामध्ये खिन्नता येते. तुम्ही निराश विचारांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.

व्यवसाय:-  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, उच्च गणित, कोळसा, लाकूड, लोखंड, व्यवस्थापक, कंपनी सेक्रेटरी.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.

शुभ रंग:- निळा, जांभळा, काळा.

शुभ रत्न:- इंद्रनील, मोती आणि हिरा.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या