असा असेल तुमचा आजचा दिवस : शुक्रवार, २६ जून २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस : शुक्रवार, २६ जून २०२६
  • Positive News
  • जून 26 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : शुक्रवार, २६ जून २०२६

निज ज्येष्ठ शुक्ल द्वादशी / रात्री १०.२३ नंतर त्रयोदशी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 (संपर्क - 8087520521)

 राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

"संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे."

 चंद्रनक्षत्र - विशाखा / (संध्याकाळी ७.१६ नंतर) अनुराधा.
 आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ / दुपारी १२.३३ नंतर वृश्चिक.

 चंद्र प्रतियुती मंगळ.
 चंद्र त्रिकोण बुध.
 चंद्र त्रिकोण गुरू.

 टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

 मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)
भागीदारीच्या कामात यश मिळेल. चंद्र-बुध आणि चंद्र-गुरूच्या शुभ प्रभावामुळे महत्त्वाच्या चर्चा फलदायी ठरतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. संध्याकाळनंतर परिस्थिती अधिक अनुकूल होईल.

 वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)
कामाचा ताण वाढू शकतो, परंतु नियोजनबद्ध कामातून यश मिळेल. विरोधकांवर मात कराल. आरोग्याकडे लक्ष द्या. संध्याकाळनंतर कामातील अडथळे दूर होतील.

 मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)
विद्यार्थी, शिक्षक आणि लेखन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल. चंद्र-बुध त्रिकोणामुळे बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता वाढेल. प्रेमसंबंधात आनंददायक घडामोडी संभवतात.

 कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)
घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. मानसिक समाधान लाभेल.

 सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)
पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. लहान प्रवासाचे योग संभवतात. तुमच्या कल्पना आणि संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील.

 कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होतील. नवीन खरेदीचा योग संभवतो.

 तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
दुपारपर्यंत चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन संधींचा लाभ मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.

 वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)
दुपारनंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह वाढेल. चंद्र-गुरू त्रिकोणामुळे भाग्याची साथ लाभेल. नवीन योजना यशस्वी ठरतील. संध्याकाळनंतर अधिक अनुकूलता जाणवेल.

 धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात मन रमणार आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. संयमाने वागल्यास लाभ मिळतील.

 मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)
मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक वाढेल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन संपर्क लाभदायक ठरतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.

 कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)
व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. समाजात मान-सन्मान वाढेल.

 मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)
भाग्याची उत्तम साथ लाभेल. चंद्र-गुरूच्या शुभ प्रभावामुळे धार्मिक आणि सामाजिक कार्यात यश मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल.

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या