असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ४ सप्टेंबर
गुरूवार, ४ सप्टेंबर २०२५. भाद्रपद शुक्ल द्वादशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज शुभ दिवस आहे" वामन जयंती
चंद्र नक्षत्र - उत्तराषाढा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शनीशी शुभ लाभ योग् आहे तर हर्षलशी त्रिकोण योग आहे. अनुकूल दिवस आहे. उत्तम लाभ होतील. आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून मित्र मंडळी काम करतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नवम चंद्र आहे. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. स्वप्ने साकार होतील. योग्य त्या व्यक्तीची भेट होईल. सहलीस जाण्याचे योग आहेत. प्रवास कार्यसाधक होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. अष्टम चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. विनाकारण खर्च वाढू शकतात, वाहन जपून चालवावे. मान अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. सप्तम स्थानी चंद्र आहे. शनीची प्रतिकुलता काहीशी कमी जाणवेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. अध्यात्मिक लाभ होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) षष्ठ चंद्र आहे. नोकरी व्यवसायात चांगले अनुभव येतील. सरकारी कामात लक्ष घालावे लागेल. काही अनाकलनीय प्रश्न निर्माण होतील. मात्र त्यातून उपसननेने मार्ग निघू शकतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पंचम चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. मात्र नियोजन बदलावे लागेल. पत्नीचा गैरसमज होऊ शकतो. कनिष्ठ सहकाऱ्यांशी नम्रतेने वागावे. प्रवासात काळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चतुर्थ चंद्र आहे. विनाकारण मन अस्वस्थ राहू शकते. नोकरी/व्यवसायात कामाचा ताण जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. उपासना करा. वाहन चालवताना काळजी घ्या.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) द्वितीया चंद्र तुमचा खर्च वाढवेन मात्र तो योग कारणासाठी होईल. घरगुती गोष्टीत वेळ व्यतीत होईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. मात्र त्यांची नाराजी दूर करावी लागेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तृतीय चंद्र आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. विजयी मार्गक्रमण कराल. शत्रू पराभूत होतील. गुपिते उघड करू नका. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल दिवस आहे. ऐश्वर्य लाभेल. तुमच्या मनातील कल्पना साकार होतील. अचानक लाभ होतील. लॉटरीचा प्रयोग करण्यास हरकत नाही.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या व्यय स्थानात चंद्र आहे. संभाळवून पावले टाका. घरगुती कामासाठी वेळ द्याल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. मात्र फारसे यश मिळणार नाही.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्र अनुकूल आहे. सुखद अनुभव येतील. कलाकारांना संधी मिळतील. सरकारी कामे मार्गी लागतील. धाडसी पाऊल उचलाल.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*