मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) विकास वेगाने होत आहे. हा वेग धोकादायक ठरू शकतो, असा इशारा आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांतील १,१७८ कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला. त्यांनी अमेरिकन सरकारला एआयचा विकास नियंत्रित गतीने करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे. चाचणीत ओपनएआयच्या मॉडेलने सुरक्षित मर्यादा ओलांडल्याचा दावा करण्यात आला.
काय आहेत मागण्या?
याचिकेत एआयसाठी कडक सुरक्षा नियम तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. एखादे मॉडेल ठराविक मर्यादा ओलांडत असल्यास त्याचा विकास थांबवता किंवा मंदावता यावा, अशी व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.
'पेसिंग द फ्रंटियर' याचिका!
'पेसिंग द फ्रंटियर' या नावाने ही सार्वजनिक याचिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. ओपनएआय, गुगल, मेटा, अँथ्रॉपिक आणि मायक्रोसॉफ्टमधील कर्मचारी त्यात सहभागी झाले आहेत. एआयचा वेग माणसाच्या नियंत्रणाबाहेर जाऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे.
नेमकी चिंता काय?
भविष्यात एआय स्वतःच संशोधन करू शकतो. स्वतःच नवीन संगणकीय प्रोग्राम तयार करू शकतो. असे झाले तर त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते.
प्रमुख तज्ज्ञांचा पाठिंबा
याचिकेला अँथ्रॉपिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारिओ अमोडेई, मेटाचे मुख्य शास्त्रज्ञ शेंगजिया झाओ, ओपनएआयचे मुख्य शास्त्रज्ञ याकुब पाचोकी, तसेच ओपनएआयचे सहसंस्थापक जॉन शुलमन आणि वोज्शियेख झारेम्बा यांचा पाठिंबा आहे.