कॅस्टाइल साबण म्हणजे काय?
कॅस्टाइल साबण हा एक नैसर्गिक, वनस्पतीजन्य तेलांपासून बनवलेला साबण आहे. यामध्ये प्रामुख्याने ऑलिव्ह ऑइल, नारळ तेल, कॅस्टर ऑइल, Lye ( NaoH) , aroma essential oils यांचा वापर होतो. यामध्ये कोणतेही प्राणीजन्य घटक, रासायनिक परफ्यूम्स, किंवा हानिकारक रसायने नसतात. पारंपरिक कॅस्टाइल साबण ऑलिव्ह तेलापासून बनवला जात असे, पण आजच्या काळात नारळ तेल, बदाम तेल, हेम्प ऑईल किंवा जोजोबा तेल यांचाही वापर होतो.
हा साबण लिक्विड आणि सॉलिड अशा दोन्ही फॉर्ममध्ये तयार होतो.
हा साबण मूळतः स्पेनच्या Castile नावाच्या भागातून आला आहे, म्हणूनच याला Castile Soap म्हणतात.
---
कॅस्टाइल साबणाचे फायदे:
सल्फेट्स, पॅराबिन्स आणि कृत्रिम सुगंधांपासून मुक्त
वनस्पतीजन्य आणि क्रूरतामुक्त (cruelty-free)
पर्यावरणपूरक आणि बायोडिग्रेडेबल
त्वचेवर सौम्य आणि अॅलर्जीचा धोका कमी
एकाच उत्पादनातून अनेक उपयोग
1. त्वचेसाठी सुरक्षित:
संवेदनशील किंवा अॅलर्जिक त्वचेसाठी अतिशय उत्तम आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही वापरता येतो.
2. मल्टीपर्पज वापर:
याचा वापर केवळ अंघोळीला नाही, तर केस धुणे, चेहरा धुणे, घर स्वच्छ करणे, भांडी धुणे इत्यादींसाठी करता येतो.
3. बायोडिग्रेडेबल (निसर्गाशी सुसंगत):
पर्यावरणपूरक असल्यामुळे हे पाण्यात सहज विरघळते आणि पाण्याचे प्रदूषण करत नाही.
4. नैसर्गिक सुगंध :
यामध्ये रासायनिक परफ्यूम नसल्यामुळे त्वचेला त्रास होत नाही. हवे असल्यास तुम्ही यामध्ये एसेंशियल ऑइल्स घालू शकता.
कॅस्टाइल साबणाचा वापर कसा करावा?
1. बॉडी वॉश: थोडं साबण पाण्यात मिसळून अंघोळीला वापरा.
2. फेस वॉश: थोडं पाणी घालून diluted करून चेहऱ्यावर वापरा.
3. शॅम्पू: केस धुण्यासाठीही योग्य.
4. घरगुती क्लीनर: पाण्यात मिसळून स्वयंपाकघर, बाथरूम वगैरे स्वच्छ करण्यासाठी.
5. भांडी धुण्यासाठी: liquid castile soap थोड्या पाण्यात मिसळून वापरता येतो.
सावधगिरी:
डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या, कारण थोडं चुरचुरू शकतं.
काही जास्त concentrated प्रकार direct वापरल्यास त्वचेवर कोरडेपणा येऊ शकतो – म्हणून dilute करून वापरावा.
उपलब्ध ब्रँड्स:
Dr. Bronner’s Castile Soap
Mamaearth
Earth Rhythm
Khadi Natural