कोल्हापुरात मतदानाची टक्केवारी वाढली! कोणाच्या पथ्यावर? शिक्षक मतदारसंघासाठी ८८.७२% तर पदवीधर मतदारसंघात ६३.८३ टक्के मतदान!

कोल्हापुरात मतदानाची टक्केवारी वाढली! कोणाच्या पथ्यावर? शिक्षक मतदारसंघासाठी ८८.७२% तर पदवीधर मतदारसंघात ६३.८३ टक्के मतदान!
  • Positive News
  • ऑक्टोबर 24 2026

Share on  

कोल्हापुरात मतदानाची टक्केवारी वाढली! कोणाच्या पथ्यावर? शिक्षक मतदारसंघासाठी ८८.७२% तर पदवीधर मतदारसंघात ६३.८३ टक्के मतदान!


कोल्हापूर : पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात उत्साही सहभाग दिसून आला. पदवीधरांपेक्षा शिक्षकांमध्ये मतदानाचा जोम अधिक जाणवत होता. कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी ८८.७२ तर पदवीधर मतदारसंघात ६३.८३ टक्के मतदान झाले. प्रमुख तीन उमेदवार कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने मतदानाची टक्केवारी वाढली असल्याची चर्चा आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाभर दौरा करून मतदान केंद्रांना भेटी देतानाच मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. बोगस मतदानाचा काही प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. मतदानाची टक्केवारी वाढली असल्याने ती नेमकी कोणाच्या पत्त्यावर पडणार याची चर्चा होत आहे.

शिक्षक व पदवीधर या निवडणुकीसाठी महायुतीचे दोन्ही उमेदवार कोल्हापुरातील असल्याने गेली महिनाभर प्रचाराची राळ उडवली होती. पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव तर शिक्षक मतदार संघातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी मतदारांची संपर्क वाढवला होता. दुसरीकडे गेल्यावेळी शिक्षक मतदार संघात विजयी झालेले काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर आणि हर्षदा जाधव देशमुख या दोघांनीही मतदारांच्या गाठीभेटी देण्यावर भर दिला होता.

मतदारांचा दर वधारला

दरम्यान या निवडणुकीमध्ये अत्यंतिक चुरस असल्याने प्रत्येक मत मिळवणे हे महायुती आणि महाविकास आघाडी समोर आव्हान होते. यामुळे गुरुजींच्या मतदारसंघात दस हजार मनसबदारी सुरू होती. तर पदवीधरांसाठीही हजारोंचे लक्षणे दर्शन घडवले जात होते या उधळणेमुळे मतदानाची टक्केवारी वाढले असल्याची चर्चा होती.

मतदान केंद्रावर गर्दी

याशिवाय महायुतीकडून चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर या तिन्ही मंत्र्यांचे दोन खासदार, दहा आमदार यांनी मतदारांना महायुतीचा विजय होण्यासाठी प्रचार गतिमान केला होता. महाविकास आघाडीच्या प्रचाराची जबाबदारी काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह काही माजी आमदारांनी निभावली होती. दोन्ही बाजूकडून जोरदार प्रचार झाल्याने तसेच मतदारांना अर्थपूर्ण नजराणा पोचल्याने आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली.किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेने झाले.

नेत्यांची लगबग

महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर मतदार मतदान केंद्रांना भेटी देऊन निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. निवडणूक प्रशासन आणि पोलीस यांनीही आपले कर्तव्य चोखपणे बजावल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या