महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सारवडे गावचा सुपुत्र विश्वजित मोरे याने अमेरिकेतील लास वेगास येथे रचला इतिहास

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सारवडे गावचा सुपुत्र विश्वजित मोरे याने अमेरिकेतील लास वेगास येथे रचला इतिहास
  • Positive News
  • ऑक्टोबर 15 2026

Share on  

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सारवडे गावचा सुपुत्र विश्वजित मोरे याने अमेरिकेतील लास वेगास येथे रचला इतिहास

कोल्हापूर : महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सारवडे गावचा सुपुत्र विश्वजित मोरे याने अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या दमदार खेळाच्या जोरावर इतिहास घडवला आहे. ग्रीको-रोमन कुस्ती प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारणारा पहिला भारतीय कुस्तीपटू होण्याचा मान त्याने मिळवला आहे. त्याच्या या यशामुळे भारतीय कुस्ती क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विश्वजितने 55 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत रशियाच्या मलिक गिगिएव्ह याला 7-4 अशा गुणफरकाने पराभूत करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. आता सुवर्णपदकासाठी त्याचा सामना जॉर्जियाच्या कोबा कारुमिद्झे याच्याशी होणार आहे. या  लढतीत विजय मिळवून देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याची संधी विश्वजितसमोर आहे.
अंतिम फेरीपर्यंत पोहोचताना विश्वजितला तगड्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागला. त्याने मेक्सिकोच्या आयझॅक मारिन माटा याला 10-8 असे नमवून पुढील फेरीत प्रवेश केला. त्यानंतर 20 वर्षांखालील जागतिक विजेता असलेल्या इराणच्या आर्मिन शमसिपूर याच्याविरुद्ध 8-1 असा एकतर्फी विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. त्याच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळाने स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सलग दोन वर्षे जागतिक स्पर्धेत कांस्यपदक
विश्वजितने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. 2024 आणि 2025 या दोन्ही वर्षांत त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदके जिंकली. याशिवाय, 2024 मध्ये 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावले होते. या  यशस्वी कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय कुस्ती क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सैन्यात सेवा बजावत कुस्तीच्या मैदानातही दमदार कामगिरी


विश्वजित मोरे  याची 2025 मध्ये ‘आर्मी स्पोर्ट्स एंट्री स्कीम’अंतर्गत भारतीय सैन्याच्या मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये हवालदार म्हणून नियुक्ती झाली. देशसेवेची जबाबदारी सांभाळतानाच त्याने कुस्तीच्या मैदानातही उल्लेखनीय कामगिरी सुरू ठेवली आहे. ग्रामीण भागातून पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावणाऱ्या विश्वजितच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या क्रीडाविश्वात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. आता अंतिम लढतीत सुवर्णपदक जिंकून या यशावर कळस चढवण्याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या