तुळस: पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय?

तुळस: पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय?
  • Positive News
  • जून 8 2025

Share on  

तुळस: पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय?

तुळशीचे औषधी महत्त्व:
तुळस ही भारतीय घरांमध्ये पूजनीय आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून औषधी गुणधर्म असलेली एक महत्त्वाची वनस्पती मानली जाते. तिचा उपयोग प्राचीन काळापासून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी केला जात आहे. परंतु, आजकाल एक प्रश्न वारंवार विचारला जातो की – तुळस पोटाची चरबी कमी करण्यात उपयोगी ठरू शकते का?
किंबहुना असाही प्रश्न असतो की पोटाची चरबी कमी करण्यासाठी काय करावे? 
Central Obesity म्हणजेच वाढलेला पोटाचा घेर ही समस्या सध्या बऱ्याच लोकांना सतावत आहे आणि त्यावर उपाय करायचा असेल तर आपले चयापचय  म्हणजेच मेटाबोलिझम व्यवस्थित असणे हे फार गरजेचे आहे.

चयापचय सुधारण्यासाठी तुळशीचे फायदे:

तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्म असतात. हे गुणधर्म शरीरातील चयापचय प्रक्रिया (metabolism) वाढवण्यास मदत करतात. वाढलेला चयापचय म्हणजे शरीर अधिक ऊर्जा खर्च करते, जे वजन कमी करण्यात मदत करू शकते. 
विशेषतः संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत तुळशीचा वापर केल्यास पोटाभोवतीची चरबी कमी करण्यात यश मिळू शकते.

तुळशीच्या सेवनाचे विविध मार्ग
तुळशीचा चहा:

८ ते १० ताजी तुळशीची पाने किंवा १ चमचा सुकलेली पाने १० मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवावीत.

हा चहा रिकाम्या पोटी एकदोन वेळा घेतल्यास पचन सुधारते व भूक कमी होते.

कच्ची पाने आणि सॅलडमध्ये वापर:

ताजी पाने सॅलडमध्ये घालून खाल्ल्यास अँटीऑक्सिडंट फायदे मिळतात आणि पचनक्रिया सुधारते.

तुळशीचे कॅप्सुल्स:

ज्यांना रोज ताजी पाने मिळवणे कठीण जाते, त्यांच्यासाठी पूरक आहार (supplements) स्वरूपात कॅप्सुल्स उपयुक्त ठरू शकतात.
मात्र कोणताही पूरक आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांचा सल्ला घ्यावा.

तुळशीचे संभाव्य दुष्परिणाम

तुळस सर्वसाधारणपणे सुरक्षित आहे, परंतु काही परिस्थितींमध्ये तिचा वापर मर्यादित ठेवावा:

पचन समस्या: अतिसेवन केल्यास मळमळ, जुलाब होऊ शकतो.

रक्तातील साखर कमी होणे: मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियमित साखरेची पातळी तपासावी.

रक्त पातळ होणे: रक्त पातळ करणारी औषधे घेत असल्यास तुळस धोका वाढवू शकते.

गर्भवती महिलांसाठी प्रतिबंध: गर्भाशयावर संभाव्य परिणाम होऊ शकतो.

प्रजनन क्षमता आणि थायरॉईड समस्या: तुळशीमुळे प्रजनन क्षमता कमी होण्याची शक्यता असते आणि थायरॉईड ऑक्सिडची पातळीही प्रभावित होऊ शकते.

निष्कर्ष:
तुळस ही पचन सुधारणारी, तणाव कमी करणारी आणि चयापचय वाढवणारी औषधी वनस्पती आहे. ती थेट पोटाची चरबी कमी करत नाही, परंतु एकूणच वजन नियंत्रण प्रक्रियेत उपयुक्त ठरते. मात्र तिचा वापर करताना योग्य प्रमाण, वैद्यकीय सल्ला आणि एक समतोल जीवनशैली आवश्यक आहे.

सूचना: 
लेखातील माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून, कोणतीही औषधी वनस्पती घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
 

संबंधित बातम्या